नवी दिल्ली : छटपूजेच्या निमित्ताने केंद्र सरकारने काही सरकारी कर्मचाऱ्यांना खास भेट दिलीय. सरकारने बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केलीय. वाढीव महागाई भत्ता (DA) नोव्हेंबर 2021 पासून लागू होईल, असेही स्पष्ट करण्यात आलेय. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास नोव्हेंबर 2021 पासून या सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन वाढेल. याशिवाय या कर्मचाऱ्यांना वाढीव एचआरए दरवाढ म्हणजेच बीएसएनएल कर्मचाऱ्यांना दुहेरी लाभ मिळणार आहे.
सरकारने बीएसएनएल कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याची रक्कम 170 टक्क्यांवरून 179.3 टक्के केली. BSNL च्या बोर्ड स्तरावरील सर्व कर्मचाऱ्यांना वाढीव दराने महागाई भत्ता मिळेल. 2007 च्या वेतन सुधारणेच्या आधारे वेतन मिळालेल्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जाईल.
BSNL कर्मचार्यांचा DA 1 जुलै 2021 पासून 170.5 टक्क्यांवरून 173.8 टक्के करण्यात आला. त्यानंतर 1 ऑक्टोबर 2021 पासून तो 179.3 टक्के करण्यात आला. अलीकडे भारत संचार निगम लिमिटेडमधील एकूण 1,49,577 कर्मचाऱ्यांपैकी 78,323 कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती (VRS) घेतली होती.
डीएसोबतच केंद्र सरकारने पेन्शनधारकांच्या महागाई रिलीफमध्ये (DR) 3 टक्क्यांनी वाढ केली. DA आणि DR मधील ही वाढ 1 जुलै 2021 पासून प्रभावी मानली जाईल. आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए आणि डीआर 28 टक्क्यांवरून 31 टक्के झाला आहे. याचा फायदा 47.14 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि 68.62 लाख पेन्शनधारकांना होणार आहे.
कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) वाढ झाल्याने त्यांचा घरभाडे भत्ता (एचआरए) आणि वाहतूक भत्ता (टीए) वाढेल. या दोन्ही बाबी पगारात भर घालतात, त्यामुळे आधीच मिळालेला पगार आणखी वाढेल. याशिवाय कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसही मिळालाय. यामुळे त्यांना एकाच वेळी दोन्ही प्रकारचे फायदे मिळत आहेत. 7व्या वेतन आयोगाच्या (7th Pay Commission) वेतन मॅट्रिक्सप्रमाणे, प्रत्येक स्तरावरील कर्मचार्यांचा DA आणि HRA वाढल्याने त्यांचा पगार वाढतो. सातव्या वेतन आयोगाने आपल्या शिफारशीत यापूर्वी प्रस्तावित केले होते की, जेव्हा डीए 25 टक्क्यांपेक्षा जास्त असेल तेव्हा एचआरए देखील वाढेल आणि दर 8, 16, 24 टक्क्यांवरून 9, 18 आणि 27 टक्क्यांपर्यंत वाढेल.
ते एका उदाहरणाने समजून घेता येईल. जर एखाद्याचा मूळ पगार 30,000 रुपये असेल, तर त्याला दरमहा सुमारे 5400 ते 8100 रुपयांचा लाभ मिळेल. ताज्या अपडेटनुसार, घरभाडे भत्ता दरमहा किमान 5400 रुपये निश्चित करण्यात आलाय, जो यापेक्षा कमी असू शकत नाही. एचआरए हा पगाराचा केवळ एक भाग आहे, जो एखाद्या कंपनीकडून त्या शहरातील राहण्याचा खर्च लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांना दिला जातो. कंपनी त्याची पगार रचना, पगाराची रक्कम आणि कर्मचारी ज्या शहरात राहतो, अशा पॅरामीटर्सच्या आधारावर HRA रक्कम अदा करायची ठरवते. शहर महाग असेल तर एचआरए जास्त असेल, शहर स्वस्त असेल तर एचआरए कमी असेल. HRA वाढवण्यामागील कारण म्हणजे कर्मचाऱ्यांना खर्चात दिलासा देणे आहे.
संबंधित बातम्या
PF चे व्याज खात्यात आले नाही, अशी करा तक्रार, मिस्ड कॉल द्या किंवा SMS द्वारे 1 मिनिटात तपासा
PPF Account Merge: तुमच्याकडे एकापेक्षा जास्त पीपीएफ खाती आहेत का? असे करा विलीन