नवी दिल्लीः ऊर्जा मंत्रालयाने ऊर्जा क्षेत्रातील सायबर सुरक्षेसाठी मार्गदर्शक सूचना जारी केलीत. या सर्व सूचना ऊर्जा क्षेत्रातील संबंधितांना पाळाव्या लागणार आहेत. सरकारने जारी केलेल्या निवेदनानुसार, सायबर सुरक्षित इकोसिस्टम तयार करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. निवेदनात म्हटले आहे की, ऊर्जा क्षेत्रातील सायबर सुरक्षेबाबत सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची ही पहिलीच वेळ आहे. मार्गदर्शक तत्त्वात ऊर्जा क्षेत्रातील विविध उपयोगितांमध्ये सायबर सुरक्षेच्या तयारीसाठी आवश्यक पावले नमूद करण्यात आलीत, ज्यामुळे या क्षेत्रातील सायबर सुरक्षा तयारीची पातळी वाढेल.
संबंधितांशी सखोल चर्चा केल्यानंतर मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आलीत. यामध्ये सायबर सुरक्षा क्षेत्रात उपस्थित असलेल्या तज्ज्ञांकडूनही माहिती घेण्यात आलंय. यामध्ये सीईआरटी-इन, एनसीआयआयपीसी, एनएससीएस, आयआयटी कानपूर यांचा समावेश आहे. मार्गदर्शक तत्त्वांचा हेतू सायबर सुरक्षेची परिसंस्था निर्माण करणे आहे, असे निवेदनात म्हटले आहे. यामध्ये सायबर अॅश्युरन्स फ्रेमवर्क उपलब्ध आहे. यासह ते नियामक चौकट मजबूत करते, सुरक्षेसाठी कोणत्याही धोक्याचा लवकर इशारा देणारी एक प्रणाली तयार करते. निवेदनानुसार, हे कोणत्याही दोषांचे व्यवस्थापन करण्यात आणि रिमोट ऑपरेशन्स आणि सेवा सुरक्षित करण्यात मदत करेल.
यासह संवेदनशील माहितीची पायाभूत सुविधा सुरक्षित केली जाईल, पुरवठा साखळीशी संबंधित जोखीम कमी केली जाईल, खुल्या मानकांचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले जाईल, सायबर सुरक्षेमध्ये संशोधन आणि विकासास प्रोत्साहन दिले जाईल. या व्यतिरिक्त हे मानवी संसाधनांच्या विकासासाठी आणि प्रभावी सार्वजनिक-खासगी भागीदारी आणि सायबर सुरक्षा क्षेत्रात माहितीची देवाणघेवाण आणि सहकार्य करण्यास मदत करेल.
सरकारी निवेदनानुसार, भारतीय वीज पुरवठा प्रणालींमधील नियंत्रण प्रणालींच्या सुरक्षेसाठी काम करणाऱ्या सर्व जबाबदार संस्था, यंत्रणा उत्पादक, पुरवठादार, सेवा पुरवठादार, आयटी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर OEM यांना मार्गदर्शक तत्त्वे लागू होतील. मार्गदर्शक तत्त्वे सर्व भागधारकांनी पूर्ण करणे अनिवार्य आवश्यकता आहेत. यामध्ये सायबर स्वच्छता सुरू करणे, सर्व आयटी आणि ओटी कर्मचाऱ्यांना सायबर सुरक्षेचे प्रशिक्षण देणे, सायबर सुरक्षा प्रशिक्षण संस्था स्थापन करणे आणि देशात सायबर टेस्टिंग लॅब सुरू करण्याचा मंत्र दिला आहे.
संबंधित बातम्या
दोन दिवस शेअर बाजारात 4.16 लाख कोटी रुपयांसह गुंतवणूकदार झाले मालामाल
एअर इंडिया पुन्हा एकदा टाटा समूहाच्या ‘हाती’; आता रतन टाटा म्हणतात…
Government guidelines for cyber security in the energy sector, know everything