केंद्र सरकार 4 हजार कोटींना ॲक्सिस बँकेतील 2 टक्के शेअर्स विकणार, 5.8 कोटी शेअर्स विक्रीला

| Updated on: May 19, 2021 | 11:59 AM

केंद्र सरकारनं अ‌ॅक्सिस बँक (Axis Bank) मधील त्यांचे 2 टक्के शेअर्स विकण्याचा निर्णय घेतला आहे. (axis bank share)

केंद्र सरकार 4 हजार कोटींना ॲक्सिस बँकेतील 2 टक्के शेअर्स विकणार, 5.8 कोटी शेअर्स विक्रीला
Follow us on

नवी दिल्ली: केंद्र सरकारनं अ‌ॅक्सिस बँक (Axis Bank) मधील त्यांचे 2 टक्के शेअर्स विकण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार याद्वारे चार हजार कोटी रुपये उभारणार आहे. अ‌ॅक्सिस बँकेतील भारत सरकारचे 5.8 कोटी शेअर्स विकले जाणार आहेत. ऑफर फॉर सेल अंतर्गत एका शेअरची किंमत 680 रुपये निश्चित करण्यात आली आहे. मंगळवारी व्यापार संपला तेव्हा 4.4 टक्के सवलत होती. त्यावेळी शेअर्सचा भाव 711 रुपयांवर होता.( Government of India will sell 2 percent stake in axis bank to earn four thousand crore rupees)

19 आणि 20 मेला शेअर्स विक्री

अ‌ॅक्सिस बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 19 मे रोजी नॉन रिटेल गुंतवणूकदार आणि 20 मे रोजी रिटेल गुंतवणूकदार शेअर्स खरेदसाठी बोली लावू शकतात. केंद्र सरकारनं विक्रीला काढलेल्या एकूण शेअर्स पैकी चौथा भाग हा रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ऑफर फॉर सेलची बेस साईज 3.6 कोटी रुपये आहे. याचं 2450 कोटी आहे. ही रक्कम बँकेच्या एकूण शेअर्सपैकी 1.2 टक्के आहे. याशिवाय बँकेत प्रमोटर्सचा वाटा 51.43 टक्के, एलआयसीकडे 8.19 टक्के शेअर्स आहेत.

केंद्र सरकार अ‌ॅक्सिस बँकेतील त्यांचे शेअर्स स्पेसिफाइड अंडरटेकिंग ऑफ यूनिट ट्रस्ट ऑफ इंडिया (SUUTI) द्वारे विकणार आहे. यामध्ये SUUTI बँकेतील 3.6 शेअर्स विकण्यात येतील. बँकेत याची टक्केवारी 1.21 आहे. ओवर सब्सक्रिप्शन झाल्यानंतर 22 दशलक्ष शेअर्स विकले जातील. यामधील समभागांचं प्रमाण 0.74 टक्के आहे.

गेल्यावर्षी देखील शेअर्स विक्री

केंद्र सरकारनं गेल्या वर्षी देखील अ‌ॅक्सिस बँकेतील 1कोटी शेअर्स 600 कोटी रुपयांना विकले होते. शेअर्स विक्रीचं काम SUUTI द्वारे पूर्ण करण्यात आलं होतं. 31 मार्चपर्यंतच्या माहितीनुसार अ‌ॅक्सिस बँकेच्या SUUTI चा वाटा 3.45 टक्के आहे. आता केंद्र सरकारनं शेअर्स विक्री केल्यानंतर हा 1.5 टक्के राहिल.

संबंधित बातम्या:

PNB बँकेच्या ‘या’ सुविधेमुळे पैसे राहणार सुरक्षित, ATM कार्डच्या वापराबद्दल लाँच केले नवे फिचर

या सरकारी बँकेकडून ग्राहकांसाठी मोठं गिफ्ट, व्याज दरांमध्ये केली कपात
Government of India will sell 2 percent stake in axis bank to earn four thousand crore rupees