आयकर दिनानिमित्त SBI कडून करदात्यांना जबरदस्त ऑफर, सीए सेवा फक्त 199 रुपयात

| Updated on: Jul 24, 2021 | 12:15 PM

सीएची किमान फी 549 रुपये असली, तरी आज विशेष सवलत दिली जात आहे. बाजारात कोणत्याही कर सल्लागाराची मदत घेण्यासाठी किमान 1000-1500 रुपये खर्च करावे लागतील.

आयकर दिनानिमित्त SBI कडून करदात्यांना जबरदस्त ऑफर, सीए सेवा फक्त 199 रुपयात
Follow us on

नवी दिल्लीः आयकर दिन किंवा प्राप्तिकर दिनानिमित्त एसबीआय आपल्या ग्राहकांना विनामूल्य टॅक्स रिटर्न भरण्याची संधी देत ​​आहे. एसबीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करत ही माहिती दिलीय. करदात्यांनी योनो अॅपवर Tax2win च्या मदतीने विनामूल्य परतावा दाखल करावा. जर तुम्हाला चार्टर्ड अकाउंटंटची सेवा हवी असेल तर ही सेवा फक्त 199 रुपयांना उपलब्ध आहे. सीएची किमान फी 549 रुपये असली, तरी आज विशेष सवलत दिली जात आहे. बाजारात कोणत्याही कर सल्लागाराची मदत घेण्यासाठी किमान 1000-1500 रुपये खर्च करावे लागतील.

Tax2win करदात्यांसाठी ई-फायलिंग प्लॅटफॉर्म

Tax2win करदात्यांसाठी ई-फायलिंग प्लॅटफॉर्म आहे. त्याच्या मदतीने कर विवरण भरणे खूप सोपे आहे. तसेच ही रिटर्न भरण्याची सेवा देखील विनामूल्य आहे. एसबीआयने टॅक्स टू विनशी करार केला असून, ही सुविधा बँकेच्या योनो अ‍ॅपवरही देण्यात आलीय. आपण एसबीआय योनो वापरत असल्यास प्रथम मोबाईल पिनसह त्यामध्ये लॉगिन करा.

स्वतः फाईल करा आणि वैयक्तिक ईसीए मिळवा

आपल्याला शॉप अँड ऑर्डरच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल आणि आपल्यासमोर एक नवीन पेज उघडेल. येथे आपल्याला व्यू ऑल ऑन द टॉप कॅटेगरीज पर्यायावर क्लिक करावे लागेल. कर आणि गुंतवणुकीचा पर्याय पेजच्या तळाशी देण्यात आलाय. तिथे क्लिक केल्यावर Tax2win चा पर्याय दिसेल. तेथे क्लिक केल्याने आपल्याला एका नवीन पेजवर घेऊन जाईल. येथे आयटीआर फाईल नाऊचा पर्याय आहे. येथे स्वतः फाईल करा आणि वैयक्तिक ईसीए मिळवा.

पॅकेज सवलतीच्या किमतीसह 199 रुपयांपासून सुरू

वैयक्तिक ईसीए पॅकेज सवलतीच्या किमतीसह 199 रुपयांपासून सुरू होत आहे. तर सर्व्हिस चार्ज 549 रुपये आहे. याखेरीज सीए सर्व्हिस चार्जही वेगवेगळ्या प्रकारच्या रिटर्न्सच्या आधारे वेगळा असतो. प्राप्तिकर विभागाने वर्ष 2020 पासून आयकर दिवस किंवा प्राप्तिकर दिवस सुरू केला होता. प्राप्तिकराची 150 वर्षे पूर्ण झाल्यावर याची सुरुवात झाली. त्याच्या देशात ब्रिटीश सरकारने 1860 मध्ये ही कर प्रणाली लागू केली.


संबंधित बातम्या

जर तुम्ही YES Bank चे ग्राहक आहात तर तुम्हाला 3-4 महिन्यांत मिळणार क्रेडिट कार्ड, जाणून घ्या

12.90 रुपयांच्या शेअर्सच्या गुंतवणुकीनं गुंतवणूकदार श्रीमंत! वर्षभरात 1 लाखाचे झाले 6 लाख

Great offer from SBI to taxpayers on the occasion of Income Tax Day, CA service for only Rs 199