सध्याच्या काळात अनेकजण पैशाची गुंतवणूक करताना दिसत आहे. भविष्याची चिंता मिटावी म्हणून ही गुंतवणूक केली जाते. त्यातही म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवण्याकडे अधिक ओघ वाढला आहे. इतर गुंतवणूक योजनांच्या तुलनेत अधिक नफा आणि सोप्या पद्धतीने गुंतवणूक करण्याची संधी म्युच्युअल फंडमधून मिळते. पण म्युच्युअल फंडात पैसा गुंतवला तरी बाजारातील चढउतारावर त्याचा नफा ठरलेला असतो. याशिवाय, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी त्याचे संपूर्ण ज्ञान घेणे आणि आपल्याला अनुकूल असलेली गुंतवणूक पद्धत निवडणे अत्यंत महत्वाचे आहे.
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची मुख्यत: दोन पद्धती आहेत. एक म्हणजे लंप सम (संपूर्ण रक्कम एकाच वेळी गुंतवणे) आणि दुसरी म्हणजे एसआयपी (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन). जर बाजार स्थिर राहिला तर लंप सम गुंतवणूक ही उत्तम आहे, म्हणजेच ज्या लोकांना धोका घेण्यात स्वारस्य आहे, त्यांच्यासाठी लंप सम पर्याय अधिक चांगला ठरू शकतो. तथापि, एसआयपीला लंप सम गुंतवणुकीच्या तुलनेत कमी जोखमीचे मानले जाते. या पद्धतीत, आपल्याला नियमितपणे ठराविक रक्कम गुंतवणूक करता येते, ज्यामुळे बाजारातील चढउतार आपल्या गुंतवणुकीवर फारसा प्रभाव टाकत नाही.
भारतामध्ये एसआयपी गुंतवणुकीकडे लोकांचे अधिक आकर्षण आहे, कारण इथे छोटी रक्कम गुंतवणूक करण्याची सुविधा आहे. एसआयपीमध्ये आपण रोजच्या आर्थिक स्थितीप्रमाणे आणि वेळोवेळी गुंतवणूक करु शकता. काही फंड 100 रुपये देखील एसआयपी सुरू करण्यासाठी स्वीकारतात.
आता, किती रक्कम आपल्याला परत मिळू शकते, याबाबत अनेकांना शंका असू शकते. आपण मासिक 5,000, 10,000, 15,000 रुपये गुंतवणूक करत असाल आणि 12% व्याजदर धरून गुंतवणूक करत असाल तर किती वर्षांनंतर 10 कोटी रुपये मिळवू शकता ते पाहूया.
5,000 रुपये गुंतवणूक :
जर आपल्याला मासिक 5,000 रुपये गुंतवणूक करायची असेल तर 36 वर्षे गुंतवणूक करावी लागेल. वार्षिक 12% व्याजदर धरल्यास, आपल्याला मिळणारे एकूण रिटर्न 8 कोटी 4 लाख रुपये होईल. यासाठी एकूण गुंतवणूक 1.8 कोटी रुपये असेल. रिटर्नसह एकूण 10 कोटी 2 लाख रुपये मिळतील.
10,000 रुपये गुंतवणूक :
जर आपल्याला मासिक 10,000 रुपये गुंतवणूक करायचे असतील, तर 31 वर्षांत आपली गुंतवणूक 10.17 कोटी रुपये होईल. आपली एकूण गुंतवणूक 2.18 कोटी रुपये असेल, आणि व्याजातून मिळणारा 8 कोटी रुपयांचा नफा मिळवून आपल्याला 10.18 कोटी रुपये परत मिळतील.
15,000 रुपये गुंतवणूक :
जर आपण मासिक 15,000 रुपये गुंतवणूक करत असाल, तर 28 वर्षांच्या कालावधीत आपल्याला 9.95 कोटी रुपये मिळतील. यासाठी एकूण गुंतवणूक 2.42 कोटी रुपये असेल, आणि 12% व्याज दराने मिळणारे 7.53 कोटी रुपये यामुळे 31 वर्षांत एकूण 9.95 कोटी रुपये परत मिळतील.
( डिस्क्लेमर : म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतांना, बाजारातील नफ्या तोट्याचा विचार करा. गुंतवणूक करण्यापूर्वी वित्तीय सल्लागारांसोबत सल्ला घ्या. दिलेल्या माहितीच्या आधारावर गुंतवणूक करू नका. चुकीच्या अभ्यासावर आधारित गुंतवणुकीमुळे होणारे आर्थिक नुकसान टीव्ही 9 मराठी जबाबदार ठरणार नाही.)