GST Fraud | गल्लीत गुटखा बनवणाऱ्याकडून 871 कोटी रुपयांची जीएसटी चोरी, अधिकारीही चक्रावले

| Updated on: Jan 05, 2021 | 1:20 PM

जप्त करण्यात आलेले स्टॉक आणि रेकॉर्ड करण्यात आलेल्या वक्तव्यांच्या आधारे 831.72 कोटी रुपयांची जीएसटी चोरीचा शक्यता वर्तवण्यात आली आहे.

GST Fraud | गल्लीत गुटखा बनवणाऱ्याकडून 871 कोटी रुपयांची जीएसटी चोरी, अधिकारीही चक्रावले
जीएसटी
Follow us on

नवी दिल्ली : जीएसटी चोरीचं एक मोठं प्रकरणं दिल्लीत उघडकीस आलं आहे (GST Fraud Of Rs 871 Crore). जीएसटी चोरीच्या या प्रकरणाने अधिकारीही आश्चर्यचकित झाले आहेत. ही एक गुटखा बनवणारी कंपनी आहे. एक गुटखा बनवणारी कंपनी इतकी मोठी जीएसटची चोरी कशी करु शकते, याचा विचार करुन अधिकारीही चक्रावले आहेत. याप्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली आहे. हा आरोपी गुटखा बनवून देशभरात सप्लाय करत होता. याची त्याने कुठेही नोंद केलेली नव्हती (GST Fraud Of Rs 871 Crore).

871 कोटी रुपयांची जीएसटी चोरी

पश्चिम दिल्लीच्या सीजीएसटी कार्यालयानुसार, एक आरोपी गुटखा बनवून देशात सप्लाय करत होता, अशी गुप्त सूचना मिळाली होती. पण, आरोपीने याबाबत कुठलीही नेंदणी केलेली नव्हती. या सूचनेच्या आधारे सीजीएसटी आयुक्त आर्यालयाच्या अधिकाऱ्यांनी आरोपीच्या परिसरात धाड टाकली.

यादरम्यान, मोठ्या प्रमाणात गुटखा, चूना, साधा कत्था, तंबाखूची पानं इत्यादी कच्चा माल आढळून आला. याची एकूण किंमत 4.14 कोटी रुपये सांगण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या मते, जप्त करण्यात आलेले स्टॉक आणि रेकॉर्ड करण्यात आलेल्या माहितीच्या आधारे 831.72 कोटी रुपयांची जीएसटी चोरीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील तपास सुरु आहे.

दोन शिफ्टमध्ये 130 पेक्षा जास्त कर्मचारी गुटखा बनवायचे

सीजीएसटीच्या अधिकाऱ्यांना तपासादरम्यान, मोठ्या प्रमाणात गुटखा बनवणाऱ्या मशिन्स देखील आढळून आल्या आहेत. अधिकाऱ्यांनी धाड टाकली तेव्हा तिथे 65 कर्मचारी काम करत होते. तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, ते दोन शिफ्टमध्ये काम करत होते (GST Fraud Of Rs 871 Crore).

कर चुकवण्याच्या उद्देशाने कोणत्याही निर्गमित चालानशिवाय मालाचे उत्पादन आणि पुरवठा करणे. तसेच वस्तूंची वाहतूक करणे, जमा करणे, लपवणे, पुरवठा करणे किंवा खरेदी करणे या प्रकरणांमध्ये आरोपीला अटक करण्यात आली आहे.

या व्यक्तीला 2 जानेवारीला पटियाला हाऊस न्यायालयात मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेट (एमएम) समोर हजर करण्यात आले होते. मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेटने आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सुरु आहे.

GST Fraud Of Rs 871 Crore

संबंधित बातम्या :

GST विभागाची मोठी कारवाई, पश्चिम दिल्लीतील 832 कोटींच्या करचोरीचा भांडाफोड

GST Return Filing | दर महिन्याला जीएसटी रिटर्न फाईल करण्याची चिंता मिटली, केंद्र सरकारने नियम बदलला

1 जानेवारीपासून GST चा नियम बदणार, 45000 व्यापाऱ्यांवर होणार परिणा