GST विभागाची मोठी कारवाई, पश्चिम दिल्लीतील 832 कोटींच्या करचोरीचा भांडाफोड

832 कोटीजीएसटी करचोरी करणाऱ्या पानमसाला कंपनीचा भांडाफोड जीएसटी विभागानं केला आहे. (GST officers busted tax evasion)

GST विभागाची मोठी कारवाई, पश्चिम दिल्लीतील 832 कोटींच्या करचोरीचा भांडाफोड
जीएसटी
Follow us
| Updated on: Jan 03, 2021 | 6:42 PM

नवी दिल्ली: GST विभागाच्या अधिकाऱ्यांनी राजधानी नवी दिल्लीमध्ये मोठी कारवाई केली आहे. अधिकाऱ्यांनी पश्चिम दिल्लीमध्ये छापा टाकून 832 कोटी रुपयांच्या करचोरीचे प्रकरण उघडकीस आणले आहे. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक देखील करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जीएसटी करचोरी करणारा व्यक्ती पानमसाला बनवत होता. जीएसटी नोंदणी न करता तो पान मसाल्याचा पुरवठा करत होता. (GST officers busted tax evasion of eight hundred thirty two crore rupee in West Delhi )

GST विभागाला पान मसाला बनवणाऱ्या कंपनीबद्दल माहिती मिळाली होती. जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पश्चिम दिल्लीमध्ये जाऊन छापा टाकला. अधिकाऱ्यांनी छापा टाकला त्यावेळी कंपनीत काम सुरु होते. यावेळी पान मसाला तयार करण्याचा कच्चा माल, मशिनरी आणि तयार झालेला पान मसाला जप्त केला. अधिकाऱ्यांनी टाकलेल्या छाप्यावेळी कंपनीत 65 कामगार काम करत होते.

4 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

पानमसाला तयार करण्याचा कारखान्यातून सुमारे 4.14 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जीएसटी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या पानमसाला तयार करणाऱ्या कंपनीनं सुमारे 832 कोटी रुपयांची जीएसटी कराची चोरी केली आहे.

दरम्यान, या प्रकरणी अधिक चौकशी करण्यात येत आहे. या ठिकाणी तयार करण्यात येणार होणार पानमसाला विविध राज्यांमध्ये पाठवण्यात येत असल्याची माहिती जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला न्यायालयात हजर केले असता त्याला 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आळी आहे.

4327 कोटींच्या करचोरीचा भांडाफोड

जीएसटी विभागानं चालू आर्थिक वर्षामध्ये करचोरीची प्रकरण मोठ्या प्रमाणावर उघडीकस आणली आहे. 2020-21 या चालू आर्थिक वर्षात दिल्ली विभागात 4327 कोटी रुपयांच्या टॅक्स चोरीचा भांडाफोड करण्यात आला आहे. जीएसटी करचोरी प्रकरणी आतापर्यंत 15 लोकांना अटक करण्यात आल्याची माहिती, जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

जीएसटी रिटर्न फायलिंग नियमांमध्ये बदल

नव्या वर्षांत अनेक नियमांमध्ये बदल झाला आहे. 2021 मध्ये बँकिंग, फायनान्स, टॅक्स आणि इतर नियम बदलले आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे जीएसटी रिटर्न फायलिंगमध्येही  बदल करण्यात आले आहेत. केंद्र सरकारनं केलेल्या बदलांमुळे दर महिन्याला जीएसटी रिटर्न फाईल करणाऱ्या व्यापारांना दिलासा मिळणार आहे. जे व्यापारी दरवर्षी जीएसटी रिटर्न फाईल करत होते त्यांना तीन महिन्यांनंतर रिटर्न भरण्याची सुविधा मिळणार आहे.

संबंधित बातम्या:

GST Return Filing | दर महिन्याला जीएसटी रिटर्न फाईल करण्याची चिंता मिटली, केंद्र सरकारने नियम बदलला

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोदी सरकारला सर्वात मोठी खुशखबर

(GST officers busted tax evasion of eight hundred thirty two crore rupee in West Delhi )

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.