मुंबई : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. देशात आजपासून 256 जिल्ह्यात कुठल्याही प्रकरणाच्या सोन्याचे दागिने आणि वस्तूंवर आता हॉलमार्किंग असणं अनिवार्य करण्यात आलंय. हॉलमार्किंग हे सोनाच्या शुद्धतेचं प्रमाण आहे. आतापर्यंत हॉलमार्किंगची व्यवस्था ऐच्छिक ठेवण्यात आली होती. उपभोक्ता मामले मंत्री पीयूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या उद्योग जगतातील प्रमुख लोकांच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय. (Hallmarking on gold jewelery is now mandatory in 21 districts of Maharashtra)
केंद्र सरकारने 2019 मध्येच सोन्याचे दागिने आणि सर्व प्रकारच्या कलाकृतींवर 15 जानेवारी 2021 पासून हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात येईल अशी घोषणा केली होती. मात्र, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर चार महिन्यांसाठी म्हणजे 1 जूनपर्यंत वाढवण्यात आली. कोरोना संकटामुळे सोन्याची बाजारपेठ बंद असल्यामुळे ही मर्यादा 15 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे.
अकोला, अमरावती, धुळे, लातूर, नांदेड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, नागपूर, पालघर, रायगड, अहमदनगर,सोलापूर, जळगाव, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर ठाणे, पुणे, मुंबई अशा 21 जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आलं आहे.
सोनं खरेदी करताना प्रत्येकाच्या मनात हे खरं आहे की खोटं असा प्रश्न येतो. त्यामुळेच आपण खरेदी करत असलेलं सोनं खरं आहे का हे तपासणं महत्त्वाचं आहे. हे ओळखणं आता सोपं झालंय. 15 जून 2021 पासून सोन्याच्या दागिण्यांवर हॉलमार्किंग बंधनकारक करण्यात आलंय. या हॉलमार्कसह 4 चिन्ह तपासून तुम्ही सहजपणे खरं आणि खोटं सोनं ओळखू शकता.
भारत सरकारची मान्यता प्राप्त संस्था असलेल्या बीआयएसकडून बीआयएस मार्किंग दिली जाते. यामुळे सोन्याची शुद्धता निश्चित होते. याशिवाय त्रिभुज आकाराचा एक हॉलमार्कही दिला जातो. त्यामुळेही सोन्याची शुद्धता ओळखता येते. म्हणूनच सोने खरेदी करण्याआधी ही चिन्हे जरुर पाहा.
सोन्याची माहिती दागिण्यावरही लिहिली जाते. ही माहिती 2 प्रकारची असते. एक क्रमांक सोन्याची शुद्धता दाखवणारा कॅरेटचा असतो आणि दुसरा फाईनेस नंबर. यात सोन्याचा कॅरेट लिहिला जातो. 24 कॅरेटचं सोनं सर्वाधिक शुद्ध असतं. मात्र, दागिणे करण्यासाठी त्यात झिंक वापरावं लागत असल्यानं दागिण्याचं सोनं 22 कॅरेट असतं.
कॅरेट आणि बीएसआय हॉलमार्कसोबत हॉलमार्किंग क्रमांक लिहिलेला असतो. फोटो क्रमांक 2 मध्ये तुम्हाला तो समजू शकेल.
तुम्ही ज्या सोनाराकडे दागिणे खरेदी करता तो देखील आपलं चिन्ह आणि क्रमांक लावतो. ज्या बीआयएसकडे नोंदणीकृत सोनारचं असं चिन्हा लावू शकतात.
भात शेतीमध्ये मत्स्यपालन करुन दुप्पट कमाईची संधी, फिश राईस फार्मिंग नेमकं काय?https://t.co/ngy0Kp8OTF#Farm | #Agriculture | #Farmer | #Farmstories
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 16, 2021
संबंधित बातम्या :
Gold Hallmarking: सोन्याच्या दागिन्यांवरील हॉलमार्किंगचा ग्राहकांना काय फायदा होणार?
Gold Hallmarking: हॉलमार्किंग बंधनकारक; आता सोन्याच्या जुन्या दागिन्यांचं काय होणार?
Hallmarking on gold jewelery is now mandatory in 21 districts of Maharashtra