माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम अपयश ही यशाची पहिली पहिली असल्याचे म्हणत होते. यामुळे अपयशामुळे हार न मानता पुन्हा नव्याने प्रयत्न करायला हवे. अनेक यशस्वी उद्योजकांच्या मागे आधी आलेले अपयश असते. ऑनलाइन बेटिंग अॅप ड्रीम 11चे (Dream11) संस्थापक हर्ष जैन यांची यशोगाथा अशीच वेगळी आहे. त्यांना आठ, दहा नव्हे तर 150 वेळा अपयश आले. त्यानंतरही त्यांनी जिद्द सोडली नाही. अखेर यश मिळालेच. आज त्यांच्या कंपनीचे मूल्यांकन 65,000 कोटी रुपयांवर जाऊन पोहचले आहे. परंतु हर्ष जैन यांच्या यशाचा मार्ग सोपा नव्हता.
हर्ष जैन आणि त्यांचे व्यावसायिक भागिदार भावित सेठ यांना ड्रीम 11 ची कल्पना आली. मग त्यावर काम सुरु केले. या कंपनीसाठी गुंतवणूकदार आणण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागली. त्यांचा बिझनेस आयडिया दोन वर्षांत 150 व्हेंचर कॅपिटल (खासगी गुंतवणूकदार) फेटाळून लावला. सर्वत्र नकारघंटा मिळाल्यानंतर अखेर 2020 मध्ये त्यांना यश आले. 2020 मध्ये हर्ष जैन यांना आयपीएल प्रायोजकाचे हक्क मिळाले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. आज ड्रीम 11चे नाव सर्वांपर्यंत पोहचले आहे.
भारतातील हे कल्पनेवर आधारित प्लॅटफॉर्म आहे. यामध्ये युजर आपल्या कल्पना वापरुन क्रिकेट, हॉकी, फुटबॉल, कबड्डी आणि बास्केटबॉल खेळतो. हर्ष जैन यांना यामध्ये चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे आज त्यांच्या कंपनीचे मूल्यांकन 65 हजार कोटी रुपयांवर आहे. ते कंपनीचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार त्यांची स्वतःची संपत्ती सुमारे 67 कोटी रुपये आहे. ड्रीम 11 मधून ते वार्षिक 4 कोटी रुपये पगार घेतात. म्हणजेच मासिक पगार सुमारे 33 लाख रुपये आहे. त्यांचे एकूण वार्षिक उत्पन्न सुमारे 7-8 कोटी रुपये आहे.
हर्ष जैन मुंबईतील रहिवाशी आहेत. त्यांनी अमेरिकेतून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. अमेरिकेतील पेंसिल्वेनिया विद्यापीठात 2007 मध्ये त्यांनी इलेक्ट्रिक इंजीनियरिंगची पदवी घेतली. त्यानंतर 2014 मध्ये कोलंबिया बिजनेस स्कूलमधून एमबीए केले. त्यांनी मायक्रोसॉफ्टमध्ये इंटर्नशिप केली. त्यानंतर जय कॉर्प लिमिटेडमध्ये मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम केले. जेव्हा 2008 मध्ये आपीएल सुरु झाली तेव्हा त्यांना आणि भावित यांना फॅटेसी स्पोर्ट्स प्लेटफॉर्म लॉन्च करण्याची आयडिया आली.