नवी दिल्लीः Post Office Services Charges: येत्या काळात तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. या योजनांमध्ये तुमचे पैसे पूर्णत: सुरक्षित राहतात आणि ते चांगले परतावासुद्धा देतात. बँक डिफॉल्ट झाल्यास थकबाकी म्हणून 5 लाखांपर्यंतची रक्कम मिळण्याची हमी आहे. तर या बचत योजनांमध्ये गुंतवलेले तुमचे संपूर्ण पैसे सुरक्षित आहेत. यावर सॉवरेन गॅरंटी आहे. यासोबतच काही योजनांमध्ये आयकर सवलतीचा लाभही मिळतो. आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाखांपर्यंतच्या रकमेवर कपातीचा लाभ घेतला जाऊ शकतो. पोस्ट ऑफिसमधील काही सेवा जसे की, डुप्लिकेट पासबुक जारी करणे, खाते हस्तांतरित करणे इत्यादीसाठी शुल्क आकारले जाते.
✨ डुप्लिकेट पासबुक जारी करणे – 50 रुपये भरावे लागतील.
✨ हरवलेल्या किंवा खराब झालेल्या प्रमाणपत्राच्या बदल्यात पासबुक जारी करणे – प्रत्येक नोंदणीसाठी 10 रुपये द्यावे लागेल.
✨खात्याचे विवरणपत्र किंवा जमा पावती जारी करणे – प्रत्येकी 20 रुपये भरावे लागतील.
✨ नामांकन बदलणे किंवा रद्द करणे – यासाठी 50 रुपये भरावे लागतील.
✨खात्याचे हस्तांतरण – 100 रुपये आकारले जातील.
✨खाते प्लेजिंग करणे- यासाठी 100 रुपये भरावे लागतील.
✨बचत बँक खात्यात चेक बुक जारी करणे – एका कॅलेंडर वर्षात 10 पर्यंत पानांसाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही आणि त्यानंतर प्रत्येक चेक पानावर 2 रुपये द्यावे लागतात.
✨धनादेशाच्या अनादरासाठी शुल्क – या प्रकरणात 100 रुपये शुल्क भरावे लागेल.
पोस्ट ऑफिसच्या या लहान बचत योजनांमध्ये पोस्ट ऑफिस बचत खाते, रिकरिंग डिपॉझिट अकाऊंट, टाइम डिपॉझिट अकाऊंट, मासिक उत्पन्न योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, सुकन्या समृद्धी योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र आणि किसान विकास पत्र यांचा समावेश आहे. 1 ऑक्टोबरपासून एटीएम/डेबिट कार्डवरील वार्षिक देखभाल शुल्क 125 रुपये अधिक जीएसटी आहे. हे शुल्क 1 ऑक्टोबर 2021 आणि 30 सप्टेंबर 2022 या कालावधीसाठी लागू आहे. इंडिया पोस्ट आपल्या डेबिट कार्ड ग्राहकांना पाठवलेल्या एसएमएस अलर्टसाठी 12 रुपये (GST) आकारते. हे शुल्क डेबिट कार्डधारकांना पाठवलेल्या एसएमएस अलर्टसाठी वार्षिक शुल्क आहे.
संबंधित बातम्या