मुंबई : होम लोन अर्थात गृह कर्ज ही आजच्या घडीला सर्वांचीच गरज बनली आहे. विविध बँका वा इतर सहकारी संस्थांकडून गृह कर्जांवर आकर्षक ऑफर दिल्या जात आहेत. बँका स्वस्त व्याजदर देत घर खरेदीदारांना आपल्याकडे आकर्षित करीत आहेत. मात्र हे कर्ज घेताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. तसेच सहजासहजी कशाप्रकारे गृह कर्ज प्राप्त करायचे, गृह कर्जासाठी आपण पात्र ठरावे, यासाठी आपण नेहमीच कोणती खबरदारी घेतली पाहिजे हे आपण जाणून घेऊया. (Having trouble getting a home loan, then pay attention to these things)
जर ग्राहकांचा सिबील स्कोअर चांगला असेल तर त्याला सहज गृह कर्ज मिळू शकेल. सिबील स्कोअर ७५० च्या वर असेल, तर त्या व्यक्तीला बँका सहज गृह कर्ज मंजूर करतात. अशा कर्जदारांना विश्वासपात्र आणि जोखीममुक्त कर्जदार मानले जाते. जर सिबील स्कोअर चांगला असेल तर गृहकर्जावरील व्याज दरदेखील कमी केला जाऊ शकतो.
जर तुमचा जोडीदार काम करत असेल आणि त्याचा सिबील स्कोअर चांगला असेल तर संयुक्त गृह कर्जासाठी अर्जामध्ये सह-अर्जदार म्हणून जोडीदाराचे नाव जोडले जाऊ शकते. यामुळे ग्राहकांची कर्ज घेण्याची पात्रता वाढेल. तसेच कर्जाची मोठी रक्कमदेखील मिळू शकेल.
गृह कर्जाची परतफेड करण्यासाठी दीर्घ मुदतीची निवड करुन आपण गृह कर्ज मिळवण्याची आपली पात्रता वाढवू शकता. दीर्घ मुदतीमुळे कर्जाची परतफेड करण्यासाठी ग्राहकांना अतिरिक्त कालावधी मिळतो. यामुळे हप्त्याची रक्कमही आपल्या आवाक्यात राहते.अशा परिस्थितीत बँका वा अन्य वित्तीय संस्थांचा अधिक विश्वास असतो की ग्राहक वेळेवर कर्जाची परतफेड करू शकेल.
गृहकर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी ग्राहकाने आपले सध्याचे कर्ज परतफेड करायला हवे. जर तसे झाले नाही तर बँका असा विचार करतील की आधीच्याच कर्जाच्या ईएमआयचा ग्राहकावर भार आहे. अशा परिस्थितीत गृहकर्ज घेतल्यास ग्राहकावरील ईएमआयचा बोजा वाढेल आणि तो हप्ते भरण्यास उशीर करु शकेल. अशाप्रकारे, भविष्यात बँकांसाठी जोखमीत वाढ होऊ शकते. त्याचवेळी आधीचे कर्ज असल्यास बँका गृह कर्जाची रक्कमदेखील कमी करू शकतात.
आपल्याकडे पार्ट टाईम व्यवसाय किंवा भाडे उत्पन्नासारख्या अतिरिक्त उत्पन्नाचे स्त्रोत असल्यास, यामुळे आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. आपल्याकडे असे स्रोत असल्यास, कृपया कर्जासाठी अर्ज करताना याविषयी माहिती द्या. यामुळे ग्राहकांची कर्ज घेण्याची पात्रता वाढेल. याशिवाय ग्राहकाला मोठ्या कर्जाची रक्कमही मिळू शकते.
Aadhaar Card : आधारकार्डचा फोटो बदलायचा आहे? वापरा ‘ही’ सोपी पद्धतhttps://t.co/iqO3bivMkC#AadhaarCard #UIDAI
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 21, 2021
इतर बातम्या
चालू आर्थिक वर्षात सोन्याच्या आयातीत 3.3 टक्के घट, व्यापार तूट कमी करण्यास मदत