Banking Alert | HDFC ग्राहकांनो लक्ष द्या! महत्त्वाचे व्यवहार लवकर उरका, काही तासांसाठी बंद राहणार ‘या’ सेवा…

| Updated on: Jan 20, 2021 | 1:57 PM

देशातील सर्वात मोठी खासगी बँक असणाऱ्या, एचडीएफसी बँकेने (HDFC Bank) त्यांच्या ग्राहकांसाठी नुकताच एक अलर्ट जारी केला आहे.

Banking Alert | HDFC ग्राहकांनो लक्ष द्या! महत्त्वाचे व्यवहार लवकर उरका, काही तासांसाठी बंद राहणार ‘या’ सेवा...
आरबीआयचा एचडीएफसी बँकेला मोठा दिलासा, क्रेडिट कार्डवरील बंदी उठवली
Follow us on

मुंबई : देशातील सर्वात मोठी खासगी बँक असणाऱ्या, एचडीएफसी बँकेने (HDFC Bank) त्यांच्या ग्राहकांसाठी नुकताच एक अलर्ट जारी केला आहे. बॅंकेच्या सर्व ग्राहकांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये बँकेने म्हटले आहे की, ‘उद्या (21 जानेवारी) काही तासांसाठी ग्राहक सर्व प्रकारच्या ऑनलाईन बँकिंग सेवा वापरू शकणार नाहीत. तथापि, यावेळी आपण एटीएमचा वापर करून रोख रक्कम काढण्यास सक्षम असाल.’(HDFC Bank Alert Due to scheduled maintenance net banking app will not be available for few hours on 21 january)

बँकेने यापूर्वीच खातेदारांना याबाबतची माहिती दिली आहे, जेणेकरुन लोक केवळ बँकिंग संबंधित व्यवहार त्यांच्या गरजेनुसार अगोदरच पूर्ण करून घेऊ शकतात. बँकेच्या नेट बँकिंग सेवेवर काही तासांसाठी परिणाम होत असल्याने, ग्राहकांचे काम थांबू नये. ग्राहकांच्या सोय लक्षात घेता बॅंकेने आधीच अलर्ट केले आहे.

बँकेचा मेल

एचडीएफसी बॅंकेने ग्राहकांना पाठवलेल्या मेलमध्ये याविषयी सांगताना म्हटले की, ‘21 जानेवारी, 2021 रोजी शेड्युल मेंटेनन्सच्या कारणाने त्यांची नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग अ‍ॅप सेवा रात्री 12:00 ते पहाटे 04:00 पर्यंत बंद राहणार आहे. या गैरसोयीबद्दल क्षमस्व. आम्ही नेट बॅंकिंग आणि मोबाईल बँकिंग अ‍ॅपच्या सेवा सुधारण्या करता बँक सातत्याने तांत्रिक दुरुस्त्या करत आहे. जेणेकरुन ग्राहकांना कोणत्याही त्रासाला सामोरे न जात, या सेवांचा आनंद घेता येईल.’ यापूर्वी, मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये शेड्युल मेंटेनन्स केल्यामुळे एचडीएफसी बँकेचे नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग अ‍ॅप काही काळापुरते व्यवहारासाठी उपलब्ध नव्हते (HDFC Bank Alert Due to scheduled maintenance net banking app will not be available for few hours on 21 january).

‘तोंड बंद ठेवा’ अभियान

एचडीएफसी बँकेने आता आपल्या ग्राहकांना सायबर फसवणूक आणि ऑनलाईन फसवणूकीपासून वाचवण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू केली आहे. ‘मुह बंद रखो’ अशा नावाची ही नवी मोहीम बँकेने सुरू केली आहे. या मोहिमेचे उद्दीष्ट ग्राहकांमध्ये जागरूकता वाढवणे आणि सायबर गुन्हेगारी रोखणे हे आहे.

या मोहिमेंतर्गत एचडीएफसी बँकेच्यावतीने आयोजित कार्यशाळेत अत्यंत सोप्या पद्धतीने कोणतीही फसवणूक होऊ नये, यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत. यात कार्ड, सीव्हीव्ही, एक्सपायरी डेट, ओटीपी, नेटबँकिंग / मोबाईल बँकिंग, लॉग इन आयडी आणि पासवर्ड इत्यादींचा तपशील कोणाबरोबरही शेअर न करण्याबद्दल जागरूक केले जाणार आहे.

(HDFC Bank Alert Due to scheduled maintenance net banking app will not be available for few hours on 21 january)

हेही वाचा :