मुंबई : उतारवयात शरीर थकलेलं असते तर पुरेशी गंगाजळी हाती नसते. योग्य वेळीच उतारवयाचं नियोजन करणे त्यामुळेच आवश्यक असते. यासाठी मार्केटमध्ये अनेक योजना उपलब्ध आहेत. आता HDFC लाईफने अनोखी योजना सादर केली आहे. सिस्टिमॅटीक रिटायरमेंट प्लॅन (HDFC Life Systematic Retirement Plan) नावाने ही योजना ओळखली जाते. ही योजना तुम्हाला इंडिविजुअल, ग्रुप, नॉन-पार्टिसिपेटिंग, नॉन-लिंक्ड, सेविंग्स डेफर्ड एन्युटी प्लान अशा वर्गीकरणात उपलब्ध आहे. योजनाधारकाला त्याच्या निवृत्तीवयापर्यंत योग्य ती सुनिश्चित बचत करण्यासाठी ही योजना चांगली असून उतारवयातील अर्थनियोजनासाठी या पॉलिसीचा मोठा आधार मिळू शकतो.
आर्थिक स्वयंपुर्णता सोबतच निवृत्ती वयासाठीही काही नियोजन करणे अत्यावश्यक झाले आहे. एका अहवालानुसार, भारतीय निवृत्तीनंतर वंचित जीवन जगतात. कारण जीवनभर पै-पै जमा केलेली पुंजी खर्चात उडून जाईल याची त्यांना कायम भीती असते. एन्युटी जैसे इंन्शुरन्स प्रॉडक्ट एक सुनिश्चित रक्कमेची खात्री देतात. ज्यामुळे ग्राहकांच्या उतारवयातील जीवीत हानी पासूनचे विमा संरक्षण मिळते.
सिस्टिमॅटीक रिटायरमेंट प्लॅन (HDFC Life Systematic Retirement Plan) ग्राहकांना पॉलिसीच्या सुरुवातीला वार्षिक व्याज दर लॉक करण्याचे स्वातंत्र्य आणि अधिकार देतो. या प्लॅनचे दोन पर्याय आहेत. लाईफ एन्युटी (Life Annuity) आणि लाईफ विथ रिटर्न ऑफ प्रिमियम (Life Annuity with Return of Premiums) असे ते दोन पर्याय आहेत.
आपत्कालीन स्थितीत योजना महत्वाची
HDFC Lifeने योजनेच्या जाहिर केलेल्या निवेदनात या योजनेची गरज विषद केली आहे. अपेक्षा आणि महागाई यांची जोडगोळ तुम्हाला भविष्यातील वाढत्या मागणी पूर्ण करण्यासाठीची चिंता आताच वाढवू शकते. त्यामुळे तुमची निवृत्तीचे नियोजन जटील होऊ शकते. सध्या कुटुंब सिमीत होत आहे. मुलं शिकून त्यांच्या नोकरीनिमित्त जगभर जात आहेत. त्यामुळे त्यांच्या अपेक्षा पूर्ण करत तुम्हाला उतारवयातील औषधी आणि दैनंदिन खर्चाची सांगड घालणे तारेवरची कसरत होणार आहे. त्यामुळे या सुवर्ण दिनासाठी अगोदरच आर्थिक नियोजन करुन सूख अनुभवा असा मंत्र लाईफने दिला आहे.
काय आहेत या योजनेचे वैशिष्ट्ये
व्यक्तीला 5 ते 15 वर्षे हफ्ता भरण्याचा कालावधी निवडीचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
ग्राहक 15 वर्षांपर्यंतचा कालावधी सुनिश्चित करु शकतो.
ही योजना सुरु करण्यासाठी ग्राहकाला मेडिकल अथवा इतर आरोग्यविषयक बाबींची माहिती भरुन न घेता 24 तासातच पॉलिसीचे संरक्षण सुरु होते.
एका ठराविक कालमर्यादेसाठी रक्कम जमा करत, तुम्ही आयुष्यभरासाठी खात्रीशीर रक्कम प्राप्त करु शकतात.
एन्युटी रेट ची सुरुवातीला खात्री देण्यात येईल नंतर ती अपरिवर्तीत राहिल
रिटार्यमेंटनंतरची रक्कम ही योजना सुरु करताना जमा करण्यात येणा-या हफ्त्यांवर आधारित असेल
वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस अथवा अन्य विशेष दिवशी तुम्ही एन्युटी रक्कम भरण्याची तारीख सुनिश्चित करु शकता
एलए-आरओपी (LA-ROP) पर्यायद्वारे तुम्ही मृत्यू पश्चात जमा केलेली मुळ राशी परत मागण्याचा पर्याय निवडू शकता
या योजनेसाठी कमीत कमी 45 आणि जास्तीतजास्त 75 वर्षे वयाची मर्यादा घालून देण्यात आली आहे.
या योजनेचा हफ्ता तुम्ही मासिक, त्रैमासिक, अर्ध-वार्षिक वा वार्षिक असा स्वीकारु शकता.
योजनेचा कालावधी आणि हफ्ता भरण्याचा कालावधी 5 ते 15 वर्षे आहे.
निवृत्तीनंतर जीवन आनंदी जगण्यासाठी आजच योजना समजून तुमचे जीवन चिंतामुक्त करा
संबंधित बातम्या :
नव्या वर्षात विमान प्रवास होणार स्वस्त?; जेट एअरवेज 2.0, अकासा प्रवाशांच्या सेवत