नवी दिल्लीः गृहनिर्माण वित्त कंपनी एचडीएफसीने गृहकर्जाचे दर कमी करण्याची घोषणा केलीय. सणासुदीचा हंगाम (Festival Bonanza Offer) पाहता गृहकर्जाचे दर कमी करण्याची घोषणा करण्यात आलीय. 20 सप्टेंबरपासून कमी दराने गृहकर्ज दिले जाणार आहे. एचडीएफसीने ग्राहकांना 6.70 टक्के दराने गृहकर्ज देण्याचा निर्णय घेतला. ही योजना 31 ऑक्टोबरपर्यंत चालेल.
ही योजना सर्व नवीन कर्ज अर्जांवर लागू होणार आहे. कर्ज घेणाऱ्या व्यक्तीची श्रेणी आणि कर्जाची रक्कम या योजनेवर परिणाम करणार नाही. एचडीएफसीने एका निवेदनात म्हटले आहे की, भारतातील आघाडीची गृहनिर्माण वित्त कंपनी एचडीएफसीने मर्यादित कालावधीसाठी विशेष गृह कर्ज सुरू केले आहे. या अंतर्गत ग्राहक 6.70 टक्के दराने गृहकर्ज घेऊ शकतील आणि ही सुविधा 20 सप्टेंबरपासून लागू होईल. ही योजना सर्व कर्ज अर्जांवर लागू होईल. गृह कर्जाचा विशिष्ट दर कर्जदाराच्या क्रेडिट स्कोअरवर अवलंबून असेल. ही एक क्लोज एंडेड योजना आहे, जी 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत चालेल.
एचडीएफसी लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक रेणू सूद कर्नाड यांनी या योजनेबद्दल माहिती दिली. “देशातील बहुतांश भागात मालमत्तेच्या किमती कमी -अधिक समान राहिल्यात. आज गृहनिर्माण क्षेत्र पूर्वीपेक्षा अधिक परवडणारे आहे. लोकांच्या उत्पन्नाची पातळी वाढली असताना गेल्या दोन वर्षांत मालमत्तेच्या किमती जवळपास सारख्याच राहिल्यात. यामध्ये PMAY मधील व्याजदर, सबसिडी आणि कर लाभात विक्रमी घट झाल्याने ग्राहकांना आणखी मदत झाली. दुसरीकडे एचडीएफसीची उपकंपनी एचडीएफसी बँकेने किरकोळ कर्ज दुप्पट करण्याचा विचार केला, कारण ग्राहकांकडून मागणी वाढत आहे. एचडीएफसी बँकेचे रिटेल अॅसेट हेड अरविंद कपिल म्हणाले की, आता अनिश्चिततेचे काळ कमी होतोय आणि व्यवसायात सुधारणा होत असताना वाढीला वेग येतोय.
एचडीएफसीने स्टेट बँकेच्या पावलावर पाऊल टाकत गृहकर्जाचे दर कमी करण्याचा निर्णय घेतलाय. स्टेट बँक फेस्टिव्ह बोनान्झा ऑफर अंतर्गत 6.70 टक्के दराने गृहकर्ज देते. हे पाहता पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा आणि खासगी बँक कोटक महिंद्रा यांनीही गृहकर्जाचे दर कमी करण्याची घोषणा केली. यानंतर एचडीएफसीने 6.7 टक्के दराने गृहकर्ज देण्याची घोषणा केली. सर्व कर्ज स्लॅबसाठी 6.70 टक्के दराने कर्ज दिले जाणार आहे आणि सर्व ग्राहकांसाठी समान प्रमाणात लागू होईल.
कर्ज घेण्यासाठी क्रेडिट स्कोर 800 पेक्षा जास्त असावा. ही कर्ज योजना सुरू होण्यापूर्वी 75 लाखांपेक्षा जास्त कर्जावर पगारदार ग्राहकांसाठी 7.15% व्याजदर आणि क्रेडिट स्कोअर 800 निश्चित केले गेलेत. स्वयंरोजगार करणाऱ्यांसाठी 7.30 व्याजदर निश्चित करण्यात आला. या आधारावर कर्जाचा दर पगारदार लोकांसाठी 45 बीपीएस आणि स्वयंरोजगार लोकांसाठी 60 बीपीएसने कमी केला. कर्जाचा विशिष्ट दर क्रेडिट स्कोअरवर अवलंबून असेल. ही योजना 31 ऑक्टोबरपर्यंत चालेल.
संबंधित बातम्या
अवघ्या 1 लाखात घरी न्या Maruti ची 32 KM मायलेज देणारी कार, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर
फाटलेल्या नोटांबाबत मोठी बातमी, RBI ने सर्व बँकांच्या ग्राहकांना दिल्या ‘या’ सूचना
HDFC’s gift to billions of customers; Home loan cheaper, plan implemented till October 31