24 जानेवारी 2023 भारताच्या इतिहासात ही तारीख अनेकांच्या लक्षात असेल. खासकरुन देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आणि अदानी ग्रुपचे प्रमुख गौतम अदानी यांना. याच दिवशी अमेरिकेची शॉर्ट सेलर फर्म हिंडनबर्ग रिसर्चने अदानी समूहाबद्दल एक रिपोर्ट जारी केला होता. त्यानंतर फक्त अदानी ग्रुपचेच शेअर्स कोसळले नाहीत, संपूर्ण शेअर बाजार हादरला. आता याच हिंडनबर्ग रिसर्चने भारताबद्दल आणखी एक मोठा इशारा दिला आहे.
हिंडनबर्ग रिसर्चने जानेवारी 2023 मध्ये अदानी ग्रुप विरुद्ध एक रिपोर्ट जारी केलेला. अदानी ग्रुपच्या शेयर्सने शॉर्ट पोजिशन घेतली आहे. त्यावेळी हिंडनबर्गने हे स्पष्ट केलं नव्हतं की, त्यांनी कोणासाठी ही शॉर्ट पोजिशन घेतली आहे. हिंडनबर्ग रिसर्चने आज 10 ऑगस्टच्या सकाळी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एक पोस्ट केलीय. त्यात लिहिलय ‘भारतात लवकरच काही तरी मोठं घडणार आहे’
गुंतवणूकदारांवर परिणाम होणार का?
आता हिंडनबर्गच्या निशाण्यावर कोण आहे? हे त्यांच्या एक्सवरील पोस्टवरुन स्पष्ट होत नाहीय. पण हिंडनबर्गच्या अशा प्रकारचा इशारा देण्यामुळे शेयर बाजारतील गुंतवणूकदारांवर परिणाम होऊ शकतो. इतकच नाही, सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या मनात पुन्हा एकदा अदानी ग्रुपबद्दल संशय निर्माण होऊ शकतो. काही युजर्सनी हिंडनबर्गच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलय. हिंडनबर्ग रिसर्चच्या पोस्टवर यूजर्सनी केलेल्या कमेंटसवरुन ही गोष्ट लक्षात येते.
Something big soon India
— Hindenburg Research (@HindenburgRes) August 10, 2024
श्रीमंतांच्या यादीतून आऊट
हिंडनबर्ग रिसर्चने गौतम अदानी यांच्या समूहाविरुद्ध रिपोर्ट जारी केल्यानंतर अदानी यांच्या कंपन्यांचे शेयर्स कोसळले होते. रिपोर्ट येण्याआधी अदानी ग्रुपचे चेयरमेन गौतम अदानी जगातील टॉप-5 श्रीमंतांमध्ये होते. पण या रिपोर्टनंतर काही दिवसात त्यांची संपत्ती निम्मी झाली. ते जगातील टॉप-25 श्रीमंतांच्या यादीतून सुद्धा बाहेर फेकले गेले. पण वर्षभराच्या आताच गौतम अदानी यांच्या कंपनीने रिकवरी केली. आता ते भारतात ते श्रीमंताच्या यादीत दुसऱ्या स्थानावर तर जगातील टॉप-15 मध्ये आहेत. हिंडनबर्ग रिसर्चने आपल्या रिपोर्टमध्ये अदानी ग्रुपवर सर्वाधिक कर्ज घेण्याचा, शेयर प्राइसमध्ये मॅन्युपुलेट आणि अकाऊंटिंगमध्ये गडबडी असल्याचा गंभीर आरोप केला होता.