Marathi News Business Housing loan offer tata housing company giving discounts on home loan festival offer with low interest
Big offer : 4 % हून कमी व्याजदरात मिळणार गृह कर्ज, 25 हजार ते 8 लाखांपर्यत व्हाऊचर
जर तुम्ही घर किंवा वाहन खरेदी करण्यासाठी चांगला मुहूर्त शोधत असाल तर कमी व्याजदरात कर्जाच्या चांगल्या ऑफर्स या फेस्टिव्हि सिझनमध्ये देण्यात आल्या आहेत.
1 / 7
महागाईच्या या जगात घर घ्यायचं म्हणजे कर्जाची मोठी चिंता असते. पण फेस्टिव्ह सिझनमध्ये घरी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही घर किंवा वाहन खरेदी करण्यासाठी चांगला मुहूर्त शोधत असाल तर कमी व्याजदरात कर्जाच्या चांगल्या ऑफर्स या फेस्टिव्हि सिझनमध्ये देण्यात आल्या आहेत.
2 / 7
टाटा हाऊसिंगने कमी व्याजदरात कर्जाची एक खास योजना लॉन्च केली आहे. यामधअये कंपनी फक्त 3.99 म्हणजेच 4 टक्क्यांवर गृह कर्ज देत आहे.
3 / 7
ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी ही योजना बाजारात आणली आहे. गृह खरेदीची ही खास योजना 20 नोव्हेंबरपर्यंत 10 प्रकल्पांसाठी मान्य करण्यात आली आहे.
4 / 7
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांना बुकिंगनंतर प्रॉपर्टीच्या आधारावर 25,000 रुपयांपासून ते 8 लाखापर्यंत गिफ्ट व्हाउचरदेखील मिळणार आहे. यामध्ये दहा टक्के भरल्यानंतर आणि मालमत्तेची नोंदणी केल्यानंतर व्हाउचर देण्यात येईल.
5 / 7
या फेस्टिव्हि सिझनमध्ये स्टे बँक ऑफ इंडिया (SBI) आणि एचडीएफसी (HDFC) बँक स्वस्तात गृह किंवा वाहन खरेदीच्या ऑफर्स देत आहेत. आरबीआयने नुकतंच रेपो दरांमध्ये कपात केली आहे. या आधारावर बँक आपल्या ग्राहकांना स्वस्तात कर्ज घेण्याची सुवर्णसंधी देत आहे.
6 / 7
कर्जाच्या 20 वर्षांच्या कालावधीसाठी बँक ऑफ इंडिया आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया 75 लाख रुपयांच्या गृह कर्जावर 6.85 टक्के दराने कर्ज देत आहे. कॅनरा बँक आणि पंजाब आणि सिंध बँक 6.90 टक्के व्याज दराने 75 लाख रुपयांचे कर्ज देत आहे.
7 / 7
एसबीआय 7.20 टक्के व्याजदराने कर्जाची ऑफर देत आहे. एचडीएफसी लिमिटेड आणि एलआयसी हाउसिंग फायनान्स 75 लाख रुपयांच्या गृह कर्जावर 7 टक्के व्याज आकारत आहेत.