Loan हवंय पण सॅलरी स्लीप नाही, तर कसं मिळेल कर्ज? पाहा

| Updated on: Dec 08, 2022 | 5:19 PM

कर्ज घेण्यासाठी तुम्हाला मिळणारे उत्पन्न किती याची माहिती कागदपत्रावर हवी असते. त्यावरच तुम्हाला कर्ज दिलं जातं. पण ज्यांच्याकडे सॅलरी स्लीप नाही. त्यांनी काय केले पाहिजे. जाणून घ्या.

Loan हवंय पण सॅलरी स्लीप नाही, तर कसं मिळेल कर्ज? पाहा
Follow us on

मुंबई : जगात आता सगळं काही लोनवर (Loan) मिळू लागलं आहे. सगळ्या गोष्टींसाठी EMI उपलब्ध झाले आहेत. लोकांकडे वस्तू खरेदी करायची असो किंवा घर, आता तर हॉस्पिटल बिलवर देखील लोन उपलब्ध झाले आहे. कर्ज घेताना बँका ते सहज देते असं नाही. त्यासाठी तुमच्याकडे आवश्यक कागदपत्र असली पाहिजे. अन्यथा तुम्हाला बँका लोन देत नाही. जे नोकरी करतात त्यांना कर्ज सहज मिळून जातं. पण जे नोकरी करत नाहीत. किंवा ज्यांच्याकडे सॅलरी स्लीप नसते. त्यांना कर्ज घेताना समस्या येतात. (How to  get loan without salary slip)

बँकेकडून कर्ज घेण्याची प्रक्रिया आता ऑनलाईन झाली आहे. तुम्ही ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तुमच्याकडचे कागदपत्र तपासले जातात. पण जर तुमच्याकडे सॅलरी स्लीप नसेल तर तुम्हाला कर्ज मिळणं सहज शक्य होत नाही. अशावेळी ज्यांच्याकडे सॅलरी स्लीप नाही त्यांनी काय केले पाहिजे. हे जाणून घेणार आहोत.

पगार स्लीपशिवाय कर्ज

लोकांकडे उत्पन्न आहे. पंरतु त्याचा पुरावा नसतो. नोकरी करतात पण पगाराची स्लीप नसते.अशा परिस्थितीत जर कोणाला वैयक्तिक कर्ज हवे असेल तर त्याला पगाराच्या स्लीपशिवाय वैयक्तिक कर्ज कसे मिळेल?

जर तुम्हाला वैयक्तिक कर्ज हवे असेल परंतु तुमच्याकडे सॅलरी स्लिप नसेल तरीही तुम्ही वैयक्तिक कर्ज मिळवू शकते.यासाठीही काही पात्रता पूर्ण करावी लागेल.तुम्ही तुमचे बँक खाते तपशील/ फॉर्म 16/ नियोक्त्याकडून मिळालेले कर्मचारी प्रमाणपत्र इ. उत्पन्नाचा पुरावा म्हणून पगाराच्या स्लीपशिवाय वैयक्तिक कर्ज मिळवण्यासाठी सबमिट करू शकता.