7th Pay Commission : DA वाढल्यानंतर तुमच्या PF आणि HRA वर काय परिणाम होणार? जाणून घ्या

| Updated on: Jul 18, 2021 | 1:27 PM

सरकारने गेल्या वर्षी जानेवारीपासून त्यावर बंदी घातली होती. आता दीड वर्षानंतर तिन्ही हप्त्यांवरील स्थगिती काढून टाकण्यात आली.

7th Pay Commission : DA वाढल्यानंतर तुमच्या PF आणि  HRA वर काय परिणाम होणार? जाणून घ्या
आज आम्ही आपल्याला ऑगस्ट 2021 महिन्यात बँकांना कधी सुट्टी असेल याची तारीख सांगणार आहोत. 1 ऑगस्ट 2021: हा दिवस रविवार असल्याने बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल. 8 ऑगस्ट 2021: रविवार असल्याने या दिवशी बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल. 13 ऑगस्ट 2021: Patriot’s Day मुळे या दिवशी इम्फाल झोनमध्ये बँकेची सुट्टी असेल. 14 ऑगस्ट 2021 : या दिवशी दुसरा शनिवार असल्याने बँकांना सुट्टी असेल.
Follow us on

मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाने अखेर कोट्यवधी केंद्रीय कर्मचारी 18 महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या निर्णयाला मान्यता दिली. सातव्या वेतन आयोगांतर्गत महत्त्वपूर्ण निर्णय घेत मंत्रिमंडळाने केंद्रीय कर्मचार्‍यांचा डीए 11 टक्क्यांनी वाढवून 28 टक्के करण्यास मान्यता दिलीय. आता सरकारच्या या निर्णयामुळे 10,000 रुपये ग्रेड असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना सुमारे 2.88 लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे. (how DA hike will impact government employee salary PF contribution HRA)

डीए 17 ते 28 टक्के झाला

जानेवारी 2020 मध्ये केंद्रीय कर्मचार्‍यांच्या डीएमध्ये चार टक्के वाढ करण्यात आली. यानंतर दुसऱ्या सहामाहीत (जून 2020) तीन टक्क्यांनी वाढ झाली. जानेवारी 2021 मध्ये यात चार टक्क्यांनी वाढ झाली होती. अशा प्रकारे कर्मचार्‍यांना डीए 17 टक्क्यांवरून 28 टक्क्यांपर्यंत वाढवून फायदा होणार आहे. मात्र, सरकारने गेल्या वर्षी जानेवारीपासून त्यावर बंदी घातली होती. आता दीड वर्षानंतर तिन्ही हप्त्यांवरील स्थगिती काढून टाकण्यात आली.

सरकारच्या या घोषणेचा थेट फायदा देशातील सुमारे 45 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 65 लाख निवृत्तीवेतनधारकांना होणार आहे. या संख्येमध्ये विद्यमान आणि सेवानिवृत्त कर्मचार्‍यांची संख्या 1.1 कोटी आहे. म्हणजेच 1 कोटीहून अधिक कर्मचार्‍यांना डीए आणि डीआरच्या वाढीव सुविधांचा थेट लाभ मिळणार आहे. डीए आणि डीआरवरील खर्चामुळे तिजोरीवर 34,401 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा वाढणार आहे.

डीए किती मिळणार?

यानुसार येत्या 1 जुलै 2021 पासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात वाढ झाली आहे. त्यामुळे येत्या पगारात कर्मचाऱ्यांना वाढ मिळत आहे. म्हणजेच समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 10 हजार रुपये असेल तर त्याला जून 2021 नुसार 1700 रुपये डीए म्हणून मिळतील. तर जुलै महिन्यात डीएच्या स्वरुपात त्यांना 2,800 रुपये मिळतील.
डीएच्या वाढीसह केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पीएफही आणि ग्रॅच्युइटीही देखील वाढेल. पीएफ आणि ग्रॅच्युइटी दोन्ही कर्मचार्‍यांचे मूलभूत पगार आणि डीए एकत्र करून निश्चित केले जातात. जेव्हा डीएमध्ये वाढ होते तेव्हा त्याचा पगाराच्या सर्व भागावर परिणाम होतो.

कर्मचाऱ्यांना याचाच फायदा होणार

ज्या सरकारी कर्मचाऱ्यांचा ग्रेड पगार 10,000 च्या ब्रॅकेटमध्ये येतो. म्हणजेच 1,44,200 ते 2,18,200 रुपयांच्या मूलभूत पगाराच्या श्रेणीत येतो. अशा स्थितीत जर 1 जानेवारी 2020 ते जून 2020 या कालावधीत त्या कर्मचार्‍याच्या डीएची रक्कम 34608 ते 52368 रुपये होईल. यानंतर 1 जुलै 2020 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत पुढील 6 महिन्यांचा हप्ता 60564 रुपयांपासून ते 91644 रुपयांपर्यंत होणार आहे. डीए अद्याप शिल्लक असल्याने पुढील जानेवारी 1,21,2021 ते 30 जून 2021 या कालावधीत पुढील 7 महिन्यांची थकबाकी 95,172 ते 1,44,012 रुपये आहे. या सहा महिन्यांचे हे तीन हप्ते जोडले गेले तर ही रक्कम 1,90,344 रुपये ते 2,88,024 रुपयांपर्यंत असेल. म्हणजेच, या टप्प्यात येणार्‍या सरकारी कर्मचाऱ्यास 18 महिन्यांपर्यंत एकूण 2.88 लाख रुपयांचा लाभ मिळू शकेल.

HRA ची घोषणा

वाढत्या डीएबरोबरच केंद्रीय कर्मचार्‍यांनाही एचआरएचा लाभ मिळणार आहे. वेगवेगळ्या शहरांवर अवलंबून एचआरएमध्ये 3 टक्के वाढ केली जाईल. ही वाढ 1 ऑगस्ट 2021 पासून केली जाईल. सरकारच्या घोषणेनुसार नवीन एचआरए 24 टक्क्यांवरून 27 टक्के, काही शहरांमध्ये 16 ते 18 टक्के आणि शहरांमध्ये 8 ते 9 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आले आहे. कोणत्याही कर्मचार्‍यासाठी किमान एचआरए 1800 ते 3600 आणि 5400 रुपये आहे. हे ऑगस्ट 2021 पासून लागू होईल.

(how DA hike will impact government employee salary PF contribution HRA)

संबंधित बातम्या : 

Pre-EMI आणि Full EMI च्या गोंधळात अनेकांना नुकसान, जाणून घ्या सर्व काही

आता पेट्रोल, डिझेलवर नव्हे तर 100 टक्के इथेनॉलवर धावतील वाहने, पीयूष गोयल यांनी सांगितला सरकारचा प्लान

Post Office Scheme | पोस्टाची भन्नाट योजनेत पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्यात मिळतील बक्कळ पैसे