Digital Rupee | कशी कराल डिजिटल रुपयाची देवाण-घेवाण ? मोबाईलमधूनच चालणार बँक

| Updated on: Feb 03, 2022 | 7:36 AM

कलदार ते डिजिटल रुपया इथपर्यंतचा अथक प्रवास भारतीय रुपया करणार आहे. गतिमान जगाशी जुळवून घेण्याची मशागत भारतीय रुपयाने केली आहे. जागतिक पातळीवर डॉलरएवढी प्रतिष्ठा कमावितानाची सर्व पातळ्यांवरची कसरत सुरु आहे. त्यातील एक भाग म्हणजे भारतातही Central Bank Digital Currency (CBDC) हे रिझर्व्ह बँकेने जारी केलेले डिजिटल चलन याच वर्षात येऊ घातले आहे. 

Digital Rupee | कशी कराल डिजिटल रुपयाची देवाण-घेवाण ? मोबाईलमधूनच चालणार बँक
RBI AND DIGITAL RUPEE
Follow us on

RBI Digital Currency:  चलन आले तसे वस्तूविनियम पद्धत बाजूला हटली.  कागदी नोटा आल्या आणि कथील, रोकडा आणि अन्य चलन काळाच्या पडद्याआड गेली.  आता  डिजिटल (Digital) युगात कागदी नोटांना हद्दपार करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. क्रेडीट, डेबीट क्रार्ड नंतर डिजिटल पेमेंटमुळे नगद व्यवहार अवघ्या काही सेंकदावर आणि एक-दोन क्लिकवर होत आहे. चलनाचा इतिहास खूप जुना असला तरी त्यातील होत गेलेले बदल काळाच्या कसोटीवर खरे उतरले आहेत. आता आणखी एक पाऊल पुढे टाकत भारतीय रिझर्व्ह बँक देशाची स्वतःची डिजिटल करन्सी आणत आहे. डिजिटल रुपयांत येत्या काही काळात लोकांना व्यवहार करणे सोपं होईल. या करन्सीचे नाव सेंट्रल बँक ऑफ  डिजिटल करंन्सी (CBDC) असे आहे. दोन टप्प्यात ही करंन्सी आणण्याचा प्रयत्न बँक करत आहे.  CBDC बेस्ड होलसेल अकाऊंट साठी पायलट टेस्टिंग लवकरच सुरु होईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक डिजिटल करेन्सीच्या लोकार्पणासाठी स्वतःला पुर्णपणे तयार ठेवले आहे.  अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022 चा अर्थसंकल्प (Budget) सादर करताना सांगितले की, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) पुढील आर्थिक वर्षात डिजिटल रुपया बाजारात आणणार आहे. अर्थमंत्री म्हणाल्या की, डिजिटल रुपया हे केंद्रीय बँक डिजिटल चलन असेल, जे 2022-23 मध्ये सुरू केले जाईल. केंद्रीय बँक डिजिटल करन्सीमुळे (CBDC) डिजिटल अर्थव्यवस्थेला लक्षणीय चालना मिळेल, असे अर्थमंत्री म्हणाल्या. सीतारामन म्हणाल्या, “डिजिटल चलनामुळे चलन व्यवस्थापन प्रणाली आणि कार्यक्षम आणि परवडणारी होईल.”  सीबीडीसी म्हणजे काय आणि त्याचे महत्त्वाचे फायदे काय आहेत हे जाणून घेऊयात.

जाणून घ्या काय आहे सीबीडीसी

सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) हे आरबीआयने जारी केलेले डिजिटल चलन आहे. ही कायदेशीर निविदा असेल. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, हे मध्यवर्ती बँकेने जारी केलेले चलन असेल परंतु ते कागद किंवा पॉलिमरपेक्षा वेगळे असेल. बँकेच्या ताळेबंदात ही ते दर्शविण्यात येणार आहे. रोखीने व्यवहार करताना सीबीडीसीची किंमत समान असेल.

इनोवेशन हब करत आहे काम

बँकेचा नाविन्यपूर्ण विभाग (Reserve Bank Innovation Hub) डिजिटल करंन्सीवर काम करत आहे. दोन टप्प्यात ही करन्सी आणण्यात येईल. सर्वात अगोदर, रिझर्व्ह बँक होलसेल बेस्ट सीबीडीसी लॉंच करेल. याचं विकसीत रुप तयार झाले आहे. याचीही प्रायोगिक चाचणी लवकरच करण्यात येणार आहे. त्यासाठी द क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे (CCIL)  या प्रकल्पासाठी मोठे सहकार्य लागणार आहे.

सीबीडीसीची गरज काय आहे?

डिजिटल चलन जाळता येत नाही किंवा खराब होत नाही. मात्र नोटा या फाटतात, खराब होतात. तसेच त्याचा साठा करणे सोपे असते. अनेक घोटाळेबाज अधिका-यांच्या घरातून कोट्यवधींचे घबाड सापडते. त्यात मोठ्या प्रमाणात नोटांची बंडले सापडतात. या चलनामुळे कृत्रिम तुटवडा ही टाळता येईल. हे चलन वापरणे आणि व्यवहाराच्या दृष्टीने किफायतशीर असल्याने जगातील सर्वच अर्थव्यवस्था याकडे सकारात्मक दृष्टीने पाहत आहेत. पण पथदर्शी प्रकल्पाच्या पुढे एकाही देशाने पाऊल टाकलेले नाही. सीबीडीसी कोणत्याही देशाच्या अधिकृत चलनाचे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड किंवा डिजिटल टोकन आहे

जाणून घ्या कसा होईल व्यवहार

डिजिटल रुपया प्रत्यक्षात ब्लॉकचेनसह(Blockchain Technology) इतर तंत्रज्ञानावर आधारित चलन असेल. डिजिटल चलनाचे किरकोळ आणि घाऊक असे दोन प्रकार आहेत. घाऊक चलनाचा वापर वित्तीय संस्थांकडून केला जातो, तर किरकोळ डिजिटल चलनाचा वापर सामान्य लोक आणि कंपन्या करतात.

खरं तर, ब्लॉकचेन तंत्रज्ञान विकेंद्रित (Decentralized)आहे. याचा अर्थ असा की नेटवर्कमधील सर्व संगणकांवर सर्व प्रकारची माहिती दिसते. मात्र डिजिटल रुपयाचा व्यवहार करताना सहाजिकच त्याचे नियमन मध्यवर्ती बँकेकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे हे चलन मोबाईलवरुन सहज एकमेकांना पाठवता येईल आणि त्याचा व्यवहारात वापर करताना धोका राहणार नाही. तसेच खरेदीसाठी, प्रवासासाठी आणि सर्व सुविधा-सोयींसाठी हा डिजिटल रुपया वापरता येईल.

इतर बातम्या :

BUDGET 2022: चुकीला माफी, पण दंड भरुन..! आयटीआर नियमात बदल, ‘ही’ अट महत्वाची

होमलोन घेणाऱ्यांच्या संख्येत भर! HDFCच्या नफ्यात 11% वाढ, आर्थिक तिमाही अहवाल जाहीर

LIC विमा धारकांसाठी अपडेट: एलआयसीच्या 2 पॉलिसीत बदल, गुंतवणुकीपूर्वी जाणून घ्या सुधारित निकष!