मुंबई : तुम्ही नोकरी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण, नोकरीच्या पगारामधून जो पैसा तुम्ही सेव्ह करत फंडामध्ये म्हणजे ईपीएसला (EPS)जमा करता ती रक्कम निवृत्तीनंतर प्रत्येक महिन्यात तुम्हाला मिळते. पण यासाठी निवृत्तीनंतर तुम्हाला एक विशेष क्रमांक द्यावा लागणार आहे. तुम्ही बचत करण्यास सुरुवात करता तेव्हाच तुम्हाला हा नंबर दिला जातो. या नंबरला पेन्शन पेमेंट ऑर्डर (PPO) म्हणतात. पेन्शन मिळाल्यानंतर पीपीओमध्ये कुटूंबात पेन्शन कोणाला मिळणार? यांसंबंधीही माहिती असते. याची माहिती कुटुंबाला देणंही महत्वाचं असतं. (how get my ppo number for pension payment order latest news of pension epfo)
काय आहे पीपीओ?
कर्मचारी पेन्शन योजनेंतर्गत निवृत्तीनंतर पेन्शनची रक्कम मिळवण्यासाठी एक विशेष क्रमांक दिला जातो. हा नंबर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून (EPFO) दिला जातो. निवृत्त झाल्यानंतर तुम्हाला एका पत्रकाद्वारे पीपीओची माहिती दिली जाते. यावेळी जर तुम्हाला पीपीओ नंबर मिळाला नाही तर गोंधळ होऊ शकतो. पण यासाठी तुम्ही बँकेशी संपर्क साधू शकता.
बँकेमधून तुमचा पीपीओ नंबर घेण्यासाठी तुम्हाला आताच त्याची नोंद करावी लागणार आहे. तुम्ही पेन्शनधारक असाल तर आताच हा नंबर बँकेमध्ये रिझिस्टर करणं महत्त्वाचं आहे. नाहीतर भविष्यात बँकेतही याती नोंद नसल्यास आर्थिक तोटा होऊ शकतो.
हरवल्यावर कसा मिळवाल पीपीओ क्रमांक ?
तुम्ही https://mis.epfindia.gov.in/PensionPaymentEnquiry/ या वेबसाईटवर जाऊन तुमच्या खात्याची माहिती भरून पीपीओ क्रमांक मिळवू शकता. पीपीओ क्रमांकाची माहिती मिळवण्यासाठी ईपीएफओची स्वतंत्र वेबसाइट आहे. जिथं तुम्ही जीवन प्रमाणपत्र, पीपीओ क्रमांक, पेमेंट माहिती आणि पेन्शन स्टेटस पाहू शकता. (how get my ppo number for pension payment order latest news of pension epfo)
संबंधित बातम्या –
LIC ची खास योजना, प्रत्येक महिन्याला मिळतील 16000; आताच करा गुंतवणूक
RBI चा मोठा निर्णय, ‘या’ बँकेच्या ग्राहकांना आता काढता येणार फक्त 1 हजार
वयाच्या 30 व्या वर्षी व्हाल करोपडी, आता फक्त 30 रुपये गुंतवा आणि श्रीमंत व्हा!
कर्ज घेण्यासाठी धमाकेदार ऑफर, सगळ्यात कमी व्याज दरावर मिळणार 50 लाखांपर्यंत लोन
(how get my ppo number for pension payment order latest news of pension epfo)