नवी दिल्लीः भारत आणि पाकिस्तान ही दोन राष्ट्रे एकत्र स्वतंत्र झालीत. दोन्ही देशांच्या स्वातंत्र्यानंतर भारत आणि पाकिस्तानची तुलना विकासाच्या दृष्टीने केली गेली. मात्र, भारताने अनेक प्रकारे पाकिस्तानला मागे टाकले. तसेच भारत आणि पाकिस्तानची कार्यपद्धती जवळजवळ सारखीच आहे आणि काम दोन्ही देशांमध्ये एकाच पद्धतीने केले जाते. परंतु, जर आपल्याला आयकराबद्दल बोलायचे झाल्यास पाकिस्तानमधील कर प्रणाली भारतापेक्षा खूप वेगळी आहे.
पाकिस्तानमध्ये आयकर गोळा करण्याची पद्धतही वेगळी आहे, त्यामुळे तिथल्या कराचा स्लॅबही वेगळा आहे. जर तुम्हाला हे जाणून घेण्यास देखील स्वारस्य असेल की पाकिस्तानमध्ये कर प्रणाली कशी आहे आणि तेथे कमाईवर किती कर भरावा लागतो, तर आज तुम्हाला त्याची उत्तरे मिळतील. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, पाकिस्तानमध्ये कर नियम काय आहेत आणि किती उत्पन्न असलेल्या लोकांना करातून सूट मिळत नाही.
इन्कम टॅक्सबद्दल बोलायचे झाल्यास पाकिस्तानमध्ये पगार घेणाऱ्या आणि स्वयंरोजगार करणाऱ्यांसाठी स्वतंत्र कर प्रणाली आहे. म्हणजेच, पगारदार व्यक्ती आणि वेतन नसलेल्या व्यक्तीला स्वतंत्रपणे कर भरावा लागतो. जर आपण 2020-21 च्या टॅक्स स्लॅबबद्दल बोललो तर पाकिस्तानमध्ये 11 स्लॅब आहेत आणि तेथील लोकांना 5 टक्के ते 35 टक्के कर भरावा लागतो. यासह दोन्ही वर्गांना स्वतंत्र कर सूट देण्यात आलीय.
पाकिस्तानी वेबसाईट जिओ टीव्हीच्या अहवालानुसार, 2020-21 मध्ये 6 लाख रुपयांपर्यंत पगार मिळणाऱ्या व्यक्तीला टॅक्स स्लॅबच्या बाहेर ठेवण्यात आले. म्हणजेच ज्या लोकांचा पगार 6 लाखांपेक्षा कमी आहे, त्यांना कर भरावा लागत नाही. त्याचबरोबर 1 लाख 20 हजार ते 6 लाख रुपयांपर्यंत पगार असणाऱ्या लोकांना जास्त रकमेच्या 5 टक्के कर भरावा लागतो. याशिवाय 180000 ते 12 लाख रुपये पगार असणाऱ्यांना 10 टक्के, 250000 रुपये पगार असणाऱ्यांना 15, 35 लाख 17.5 टक्क्यांपर्यंत, 50 लाख 20 टक्क्यांपर्यंत टॅक्स असेल. याशिवाय 22.5, 27.5, 30, 32.5 आणि 35 टक्के करांचे स्लॅब आहेत.
या व्यतिरिक्त जे पगाराऐवजी व्यवसाय, फ्रीलान्स इत्यादीतून कमावतात त्यांच्यासाठी वेगवेगळे नियम आहेत. 6 लाख रुपये कमावणाऱ्यांना करातून सूट देण्यात आलीय, तर या श्रेणीमध्ये फक्त 4 लाख रुपये कमावणाऱ्यांना सूट देण्यात आली. म्हणजेच, जर 4 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असेल तर त्यांना कर भरावा लागत नाही आणि जर जास्त असेल तर वेगवेगळ्या स्लॅबनुसार कर आकारला जातो. या श्रेणीमध्ये 5 ते 35 टक्के कर आकारला जातो. तसेच त्यात 5, 10, 15, 20, 25, 30, 35 चे स्लॅब बनवले आहेत.
भारताप्रमाणेच पाकिस्तानमध्येही अनेक व्यवहारांवर सूट आहे. उदाहरणार्थ, पाकिस्तानमध्ये देणगी वगैरेवर सवलत आहे. तसेच पगार, व्यवसाय, मालमत्ता, भांडवली नफा आणि इतर स्त्रोतांवरील उत्पन्न कर जाळ्यात समाविष्ट केलेय.
संबंधित बातम्या
SBI खास तुमच्यासाठी आणले e-RUPI, ‘या’ रक्षाबंधनात बहिणींना कॅशलेस गिफ्ट द्या
Alert! 1 सप्टेंबरपासून अॅक्सिस बँकेत ही सिस्टीम बदलणार, …तर तुमचा चेक होणार बाद
How much tax do you have to pay in Pakistan, how different is the tax system from India?