मुंबई: कोरोना संकटामुळे सध्या अनेकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. नोकरी नसल्यामुळे अनेकांना दैनंदिन खर्च चालवण्यासाठीही कर्ज घ्यावे लागत आहे. बँकांच्या अटी-शर्तींमुळे सामान्य लोकांना पटकन कर्ज मिळत नाही. त्यामुळे अनेकजण घरातील सोने गहाण (Gold loans) ठेऊन पैसे कर्जाऊ घेत आहेत. (How to Avail gold loan what is intrest rates)
सध्या बँकांशिवाय इतर काही संस्थाही सोने तारण ठेवून कर्ज देतात. एसबीआय गोल्ड आणि मुथूट फायनान्स सोने तारण ठेऊन कर्ज देणाऱ्या आघाडीच्या संस्था आहेत. मात्र, सोने तारण कर्जावरील व्याजही जास्त असते. त्यामुळे ग्राहक कायम कमी व्याजदर आकारणाऱ्या पर्यायांच्या शोधात असतात.
मण्णपुरम फायनान्स- 29 टक्के
मुथुट फायनान्स- 24 ते 26 टक्के
एक्सिस बँक- 13 टक्के
एसबीआय बँक- 7 ते 7.5 टक्के
आयसीआयसीआय बँक- 7.4 टक्के
एचडीएफसी बँक- 8.9 टक्के ते 17.23 टक्के
कॅनरा बँक- 7.35 टक्के
तुमच्याकडील सोन्याच्या दागिन्यांवर किती कर्ज द्यायचे याचे नियम प्रत्येक बँकेत वेगवेगळे असतात. एसबीआयकडून 20 हजारापासून 20 लाखांपर्यंत सोने तारण कर्ज दिले जाते. मुथुट फायनान्सकडून किमान 1500 रुपयांपासून कोणत्याही रक्कमेचे कर्ज दिले जाते.
सोने तारण ठेवून कर्ज घेण्यासाठी तुम्हाला संबंधित बँकेच्या शाखेत जावे लागते. त्याठिकाणी तुमच्याकडील सोन्याच्या दागिन्यांची तपासणी केली जाते. त्यानंतर काही कायदेशीर बाबींची पूर्तता करुन तुम्हाला सोने दिले जाते. सोन्याच्या किंमतीनुसार तुम्हाला मिळणाऱ्या कर्जाची रक्कम ठरते.
संबंधित बातम्या:
Gold Price: सोन्याचा भाव वधारला, पण अद्यापही 47 हजाराखालीच
BISच्या वेबसाईटवर हॉलमार्किंगची माहिती गायब; व्यापाऱ्यांनी ‘या’ केंद्रीय मंत्र्याला पाठवले पत्र
Gold Hallmarking च्या नियमांविषयी संभ्रमाचे वातावरण, व्यापारी नाराज
(How to Avail gold loan what is intrest rates)