केंद्र सरकारची नवी योजना; ‘या’ बिझनेसमधून करु शकता लाखोंची कमाई

| Updated on: Jun 15, 2021 | 9:58 AM

सामान्य आणि गरजू लोकांना कमी किंमतीमध्ये औषधे उपलब्ध करुन देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली होती. या माध्यमातून केंद्र सरकार गरिबांना स्वस्तात औषधे उपलब्ध करुन देते. देशात जास्तीत जास्त केंद्रे उभारण्यासाठी सरकारकडून प्रोत्साहन दिले जात आहे. | Janaushadhi Kendra

केंद्र सरकारची नवी योजना; या बिझनेसमधून करु शकता लाखोंची कमाई
Follow us on

नवी दिल्ली: केंद्रीय रसायन आणि खतमंत्री मनसुख मांडविया यांनी नुकतेच हिमाचल प्रदेशच्या कांगडा जिल्ह्यातील प्रागपूर येथे जनऔषधी केंद्राचे (Pradhanmantri Bhartiya Janaushadhi Kendra) उद्घाटन केले. मार्च 2024 पर्यंत देशभरात पंतप्रधान जनऔषधी केंद्र योजनेतंर्गत अशाप्रकारची 10 हजार आस्थापने उघडण्याचा मानस यावेळी त्यांनी जाहीर केला. सध्या देशात 7,836 जनऔषधी केंद्रे आहेत. (How to start Pradhanmantri Bhartiya Janaushadhi Kendra)

सामान्य आणि गरजू लोकांना कमी किंमतीमध्ये औषधे उपलब्ध करुन देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली होती. या माध्यमातून केंद्र सरकार गरिबांना स्वस्तात औषधे उपलब्ध करुन देते. देशात जास्तीत जास्त केंद्रे उभारण्यासाठी सरकारकडून प्रोत्साहन दिले जात आहे.

जनऔषधी केंद्र कोण सुरु करु शकते?

जनऔषधी केंद्र सुरु करण्यासाठी केंद्र सरकारने तीन वर्ग तयार केले आहेत. पहिल्या विभागानुसार बेरोजगार फार्मासिस्ट, सामान्य व्यक्ती, डॉक्टर आणि नोंदणीकृत मेडिकल व्यावसायिक हे केंद्र सुरु करु शकतात. दुसऱ्या गटात ट्रस्ट, स्वयंसेवी संस्था, खासगी रुग्णालये, स्वयंसहाय्यता गट यांचा समावेश आहे. तर तिसऱ्या गटात राज्य सरकारकडून शिफारस करण्यात आलेल्या संस्थांचा समावेश होतो.

जनऔषधी केंद्रातून कशाप्रकारे कराल कमाई?

जनऔषधी केंद्राच्या माध्यमातून येणाऱ्या उत्पन्नाचा 20 टक्के वाटा हा दुकान चालवणाऱ्याला दिला जातो. याशिवाय, संबंधित व्यावसायिकाला प्रोत्साहनपर भत्ताही दिला जातो. यापैकी नॉर्मल इंसेटिव्हमध्ये सरकार दुकान उघडण्यासाठी आलेला खर्च परत देते. यामध्ये दीड लाखांपर्यंतचे फर्निचर आणि कॉम्प्युटर आणि फ्रीजसाठी 50 हजारापर्यंत रक्कम दिली जाते. मात्र, ही रक्कम टप्प्याटप्याने दिली जाते.

जनऔषधी केंद्र सुरु करण्यासाठी काय कराल?

जनऔषधी केंद्र सुरु करण्यासाठी रिटेल ड्रग्स सेल्सचा परवाना घ्यावा लागतो. यासाठी तुम्ही https://janaushadhi.gov.in/ संकेतस्थळावरुन फॉर्म डाऊनलोड करु शकता. हा फॉर्म भरुन ब्यूरो ऑफ फॉर्मा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग ऑफ इंडियाच्या जनरल मॅनेजरकडे पाठवावा लागतो.

इतर बातम्या:

Inflation: ‘कॉमन मॅन’चा खिसा कापला जाणार; महागाईने तोडला आजवरचा रेकॉर्ड

मोहरीचे विक्रमी उत्पादन होऊनही खाद्यतेल महागच, आणखी वाढ होण्याची शक्यता

पेट्रोल-डिझेलचं ‘शतक’, मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणतात सरकारला अधिकचे पैसे पाहिजे म्हणून जास्तीचा कर

(How to start Pradhanmantri Bhartiya Janaushadhi Kendra)