नवी दिल्ली : डेबिट आणि क्रेडिट कार्ड (Debit-Credit Card) संदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 1 ऑक्टोबरपासून नियम बदलले आहेत. त्यानुसार, ऑनलाईन पेमेंट अथवा अॅपच्या माध्यमातून व्यवहार करताना डेबिट-क्रेडिट कार्डच्या डाटाला युनिक टोकनायझेशनमध्ये (Tokenization) बदलावा लागणार आहे. त्यामुळे ऑनलाईन फसवणूक होणार नाही आणि व्यवहार सुरक्षित राहतील.
या सुविधेमुळे ग्राहकांना त्यांचा वैयक्तिक आणि कार्डचा तपशील दुकानदार अथवा मर्चंट वेबसाईटला देण्याची गरज उरली नाही. टोकनायझेशनमुळे ग्राहकांना ऑनलाईन व्यवहार करताना सुरक्षा मिळणार आहे. तसेच कार्डचा तपशील, डाटा लिक होण्याची भीती दूर होणार आहे.
टोकनायझेशनचा अर्थ डेबिट अथवा क्रेडिट कार्डची मुळ माहिती एका कोडमध्ये बदलणे होय. मुळ तपशील कोडमध्ये बदलण्यात येतो. कोडलाच टोकन म्हणतात. या टोकनमध्ये कोर्डचा तपशील देण्यात येतो. ही माहिती डेबिट-क्रेडिट कार्ड कंपन्यांकडे पाठवण्यात येतो.
या कंपन्या हा तपशील कोडमध्ये रुपांतर करतात. ही प्रक्रिया काही सेकंदात पूर्ण होते. त्यामुळे ग्राहकांना या प्रक्रियेत कुठलाही उशीर होत नाही. आरबीआयने टोकनायझेशनसाठी 6 स्टेप्स सांगितल्या आहेत, ते पाहुयात..