नवी दिल्लीः भारताची वार्षिक सोन्याची मागणी 800-900 टन आहे. हा एक मोठा आयातदार आहे, परंतु किमतीच्या आधारावर कोणतेही मोठे लिक्विड स्पॉट मार्केट नाही. भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्डाने (सेबी) गोल्ड एक्स्चेंजसाठी प्रस्ताव तयार केलाय. नवीन फ्रेमवर्क काय सांगते आणि त्यात सोन्याचा व्यापार कसा होईल हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
गुंतवणूकदार इलेक्ट्रॉनिक गोल्ड पावत्या (ईजीआर) मध्ये व्यापार करू शकतात, जे विद्यमान स्टॉक एक्सचेंजमध्ये भौतिक सोन्याच्या बदल्यात जारी केले जाईल. यासह ते सेबीच्या चौकटीनुसार प्रस्तावित गोल्ड एक्सचेंजमध्येदेखील जारी केले जातील.
गुंतवणूकदार विद्यमान स्टॉक एक्स्चेंज आणि प्रस्तावित गोल्ड एक्स्चेंजवर इलेक्ट्रॉनिक गोल्ड पावत्या (ईजीआर) मध्ये व्यापार करू शकतात. भौतिक सोन्याऐवजी ईजीआर जारी केले जातील. गुंतवणूकदार व्हॉल्टमध्ये भौतिक सोने सादर करू शकतात आणि त्या बदल्यात त्यांना ईजीआर जारी केले जाईल. तिजोरी आणि स्टोरेज सेबीच्या नोंदणीकृत व्हॉल्ट व्यवस्थापकांद्वारे ठेवली जाईल. व्हॉल्ट मॅनेजर आणि सेबी नोंदणीकृत डिपॉझिटरीज फिजिकल सोन्याविरुद्ध ईजीआर जारी करण्यास परवानगी देतात. ईजीआर 1 किलो, 100 ग्रॅम आणि 50 ग्रॅम असेल. ईजीआरची वैधता कायम राहील.
ईजीआर खरेदी आणि विक्रीसाठी गोल्ड एक्सचेंज हे राष्ट्रीय प्लॅटफॉर्म असेल. तसेच सोन्यासाठी राष्ट्रीय किंमत निश्चित करण्यासाठी एक चौकट तयार करेल. सुवर्ण विनिमय मूल्य-साखळीतील सहभागींना तसेच संपूर्ण सोन्याच्या बाजारपेठेत अनेक फायदे देईल, जसे की प्रभावी आणि पारदर्शक किंमत ट्रॅकिंग, गुंतवणूक तरलता आणि सोन्याची गुणवत्ता हमी असेल. परंतु विद्यमान, नवीन शेअर बाजारांनाही ईजीआरमध्ये व्यापार करण्यास परवानगी देण्यात आलीय.
भारतीय गुंतवणूकदारांकडे सोन्यात गुंतवणूक करण्याचे अनेक पर्याय आहेत. यामध्ये फिजिकल गोल्ड मार्केट्स, गोल्ड ईटीएफ, गोल्ड फंड ऑफ फंड्स, सॉव्हरीन गोल्ड फंड्स आणि डिजिटल गोल्ड यांचा समावेश आहे. प्रत्येकाचे त्यांचे फायदे आणि तोटे आहेत. गोल्ड एक्सचेंज आणि गोल्ड ईजीआर लिक्विडिटी, सिक्युरिटी आणि टॅक्सच्या बाबतीत चांगले आहेत. अल्प ते मध्यम कालावधीत सोन्यात गुंतवणूक करणे चांगले असते.
संबंधित बातम्या
तुमचे आधार कार्ड चोरीला गेले किंवा हरवलेय का? तुम्ही घर बसल्या असा अर्ज करा
सरकारी कर्मचाऱ्यांनो लक्ष द्या! सरकारकडून ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीसाठी GPF व्याजदर जाहीर, नफा किती?