मुंबई : जर तुम्हीही स्वस्त (Gold Price) सोनं खरेदी करण्याची योजना आखत असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम चांगली संधी आहे. 1 मार्चपासून सॉवरिन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond- SGB) पुन्हा एकदा वर्गणीसाठी खुला करण्यात आला आहे. म्हणजेच तुम्ही आजपासून 1 मार्च ते 5 मार्च या कालावधीत या योजनेत गुंतवणूक करू शकता. सॉवरेन गोल्ड बाँड योजनेत बाँडची नवीन इश्यू किंमत प्रति ग्रॅम 4,662 रुपये (दहा ग्रॅम 46620 रुपये) निश्चित करण्यात आली आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ऑनलाईन SGB खरेदी करण्याची संधी देत आहे. (how you can buy sovereign gold bond online from sbi here is details)
गुंतवणूकदार व्यावसायिक बँक, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL), आरबीआय नियुक्त पोस्ट ऑफिस आणि मान्यताप्राप्त एक्सचेंजकडून देखील सोन्याचे बॉन्ड खरेदी करू शकतात. या योजनेंतर्गत वैयक्तिक गुंतवणूकदार आर्थिक वर्षात किमान 1 ग्रॅम आणि जास्तीत जास्त 4 किलो सोन्याची खरेदी करू शकतात. ट्रस्ट आणि इतर अशा युनिट्स दरवर्षी 20 किलो सोन्याची खरेदी करू शकतात.
10 ग्रॅम सोन्यावर 500 रुपयांची सूट
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आणि डिजिटल माध्यमातून पैसे भरण्यासाठी गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूट मिळेल. अशा परिस्थितीत जर तुम्ही ऑनलाईन सॉवरेन गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला प्रति 10 ग्रॅम 500 रुपयांची सूट मिळेल.
SBI कडून SGB मध्ये करा गुंतवणूक
– तुम्ही SBI नेट बँकिंग अकाऊंटमध्ये लॉग इन करा.
– eServices वर क्लिक करा आणि Sovereign Gold Bond वर जा.
– ‘नियम आणि शर्तें’ निवडा आणि ‘proceed’ वर क्लिक करा.
– रजिस्ट्रेशन फॉर्म भरा. यानंतर वन-टाईम रजिस्ट्रेशन करा.
– सबमिटवर क्लिक करा.
– खरेदी फॉर्ममध्ये सोन्याची रक्कम आणि नाममात्र तपशील प्रविष्ट करा.
– यानंतर सबमिटवर क्लिक करा. (how you can buy sovereign gold bond online from sbi here is details)
संबंधित बातम्या –
SBI ची धमाकेदार ऑफर, free मध्ये मिळणार सगळ्यात महत्त्वाच्या सुविधा
सरकार वाटणार 1 कोटी मोफत LPG Connection, लवकरच सिलेंडरही होणार स्वस्त
(how you can buy sovereign gold bond online from sbi here is details)