नवी दिल्ली: केंद्र सरकार हुडको (HUDCO) या सरकारी कंपनीतील 8 टक्के हिस्सेदारी विकणार आहे. संस्थात्मक गुंतवणुकदार मंगळवारी यासाठी 45 रुपयांच्या समभागाप्रमाणे बोली लावतील. HUDCO चे 16.01 कोटी समभाग विकून केंद्र सरकारला 720 कोटी रुपयांची कमाई होण्याची अपेक्षा आहे.
गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता प्रबंधन विभागाचे सचिव तुहिन कांत पांडे यांच्या माहितीनुसार, ऑफर फॉर सेल (OFS) पद्धतीने हुडकोच्या समभागांची विक्री होणार आहे. नॉन रिटेल गुंतवणुकदार आजपासून हे समभाग विकत घेऊ शकतात. तर सामान्य गुंतवणुकदारांसाठी ही समभाग खरेदी उद्यापासून खुली होणार आहे.
गेल्या सत्रात भांडवली बाजार बंद झाला तेव्हा हुडकोच्या समभागाची किंमत 6.22 टक्क्यांनी घसरून 47.50 रुपयांवर पोहोचली होती. OFS साठी फ्लोअर प्राईस 45 रुपये इतकी आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शहर विकास मंत्रालयाला हुडकोच्या समभागांची विक्री करण्याची मंजुरी दिली होती.
हुडकोची स्थापना 25 एप्रिल 1970 रोजी झाली होती. यापूर्वीही केंद्र सरकारने हिस्सेदारी विकून 7646 कोटी रुपये कमावले होते. त्यामध्ये 3651 कोटी रुपये OFS तर 3994 कोटी तर एक्सिस बँकेतील एसयुयुटीआयची हिस्सेदारी विकून 3994 कोटींची कमाई केली होती.
इतर बातम्या:
Income Tax पोर्टलसाठी केंद्र सरकारने मोजले 165 कोटी, पण तांत्रिक अडचणींचे शुक्लकाष्ठ संपेना
Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेल एकाच किंमतीने विकणार का, पेट्रोलियम मंत्री म्हणाले…
Union Bank of Indiaच्या विशेष योजनेतून कर्ज घेणाऱ्यांसाठी चांगली संधी, क्रेडिट लाईन वाढणार