ICICI बँकेने FD वरील व्याजदर बदलले, पटापट तपासा नवे दर

| Updated on: Dec 01, 2021 | 6:29 PM

बदलानंतर ICICI बँक 7 ते 14 दिवसांत मुदत ठेवींवर (FD) 2.50 टक्के व्याज देणार आहे. 15 ते 29 दिवसांच्या FD वर 2.50 टक्के दराने व्याज दिले जाईल आणि 30 ते 90 दिवसांच्या मुदत ठेवींवर 3 टक्के व्याज दिले जाईल. ICICI बँक 91 ते 184 दिवसांच्या मुदत ठेवींवर 3.5 टक्के व्याज मिळेल.

ICICI बँकेने FD वरील व्याजदर बदलले, पटापट तपासा नवे दर
पेन्शन
Follow us on

नवी दिल्ली : आजही जेव्हा गुंतवणुकीचा विचार येतो तेव्हा बहुतेक लोक FD म्हणजेच मुदत ठेवीची शिफारस करतात. गुंतवणुकीच्या दृष्टीने एफडी हा एक चांगला पर्याय मानला जातो, जो हमखास परतावा देतो. यामध्ये बचत खात्यापेक्षा जास्त परतावा मिळतो. खासगी क्षेत्रातील ICICI बँकेने मुदत ठेवींच्या व्याजदरात नुकतेच बदल केलेत. हा बदल 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडींवर लागू होईल. बँकेचे नवे दर 16 नोव्हेंबरपासून लागू झालेत.

15 ते 29 दिवसांच्या FD वर 2.50 टक्के दराने व्याज दिले जाणार

बदलानंतर ICICI बँक 7 ते 14 दिवसांत मुदत ठेवींवर (FD) 2.50 टक्के व्याज देणार आहे. 15 ते 29 दिवसांच्या FD वर 2.50 टक्के दराने व्याज दिले जाईल आणि 30 ते 90 दिवसांच्या मुदत ठेवींवर 3 टक्के व्याज दिले जाईल. ICICI बँक 91 ते 184 दिवसांच्या मुदत ठेवींवर 3.5 टक्के व्याज मिळेल. 185 ते 289 दिवसांत मुदत ठेवींवर 4.4 टक्के दराने व्याज मिळणार आहे.

ICICI बँक एफडी दर (2 कोटी रुपयांच्या खाली)

7 ते 14 दिवस – 2.50%
15 ते 29 दिवस – 2.50%
30 ते 45 दिवस – 3%
46 ते 60 दिवस – ३%
61 ते 90 दिवस – 3%
91 ते 120 दिवस – 3.5%
121 दिवस ते 184 दिवस – 3.5%
185 दिवस ते 210 दिवस – 4.4%
211 दिवस ते 270 दिवस – 4.4%
271 दिवस ते 289 दिवस – 4.4%
290 दिवस ते 1 वर्ष – 4.4%
1 वर्ष ते 389 दिवस – 4.9%
390 दिवस ते 18 महिने – 4.9%
18 महिने 1 दिवस ते 2 वर्षे – 5%
2 वर्षे 1 दिवस ते 3 वर्षे – 5.15%
3 वर्षे 1 दिवस ते 5 वर्षे – 5.35%
5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षे – 5.50%

ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5 टक्के अधिक व्याज

ज्येष्ठ नागरिकांना नियमित ग्राहकांपेक्षा मुदत ठेवींवर 0.50 टक्के अधिक व्याज मिळते. ताज्या बदलांनंतर ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या मुदतीच्या FD वर 3% ते 6.3% व्याज मिळेल. ICICI Bank Golden Years FD नावाची ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विशेष FD योजनादेखील आहे. या योजनेंतर्गत 5 वर्षे आणि 10 वर्षांच्या मुदतीच्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना 0.30% टक्के अतिरिक्त व्याजदर दिला जातो.

संबंधित बातम्या

नोव्हेंबरमध्ये GST मधून कमाईचा नवा विक्रम, सरकारी खात्यात 131526 कोटी जमा

LIC पॉलिसी खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी; PAN अपडेट केल्यास IPO मध्ये विशेष सूट