नवी दिल्ली : खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) ने आपल्या ग्राहकांसाठी विशेष सुविधा सुरू केली आहे. या सुविधेमध्ये ग्राहकांना इंटरनेट बँकिंग प्लॅटफॉर्मवर त्वरित ईएमआय सेवा देण्यात आली आहे. “EMI@इंटरनेट बँकिंग” असे या सुविधेचे नाव आहे. या बँक सुविधेच्या सहाय्याने ग्राहकांना डिजिटल मार्गाने ईएमआयचा लाभ मिळणार आहे. याद्वारे प्री-अप्रूव्ह ग्राहकांना पाच लाखांपर्यंतचे व्यवहार सहजपणे करता येणार आहेत. (icici bank launches instant emi facility on its internet banking platform)
इंटरनेट बँकिंग प्लॅटफॉर्मवर इन्स्टंट ईएमआय सुविधा देणारी ही पहिली बँक आहे. यापूर्वी कोणत्याही बँकेने ग्राहकांना ही सुविधा दिली नाही. लाइव्ह मिंटच्या वृत्तानुसार या वैशिष्ट्यासाठी बँकेने BillDesk आणि Razorpay यांच्याबरोबर भागीदारी केली आहे.
कसा घ्याल EMI @ Internet बँकिंग सुविधेचा फायदा
– यासाठी, तुम्हारी व्यापारी वेबसाइट आणि अॅपवर उत्पादन किंवा सेवा निवडा.
– यानंतर पेमेंट मोडमधील “ICICI Bank Internet Banking” वर क्लिक करा.
– यानंतर आपला यूजर आयडी आणि पासवर्ड भरा.
– यानंतर पेमेंट डिटेल्स पेजवर “Convert to EMI instantly” वर क्लिक करा.
– देयकाचा काळ निवडा.
– नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर आलेला ओटीपी भरा आणि यानंतर आपले देय दिले जाईल.
बँकेच्या अधिकाऱ्याने दिली माहिती
ही सेवा सुरू करताना बँकेचे अधिकारी सुदिपिता रॉय म्हणाले की, “EMI @ इंटरनेट बँकिंगची नवीन सेवा ग्राहकांना ईएमआय सुविधा प्रदान करेल. लाइव्हमिंटच्या वृत्तानुसार, हे सर्व पूर्णपणे डिजिटल आणि वेगवान असेल.
या सुविधेचे फायदे
या सुविधेद्वारे बँकेचे ग्राहक 50 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंतची उत्पादने खरेदी करू शकतात. याशिवाय तीन महिन्यांपासून, सहा महिने, नऊ महिन्यांत आणि 12 महिन्यांपर्यंत ग्राहक ईएमआयसाठी कोणताही पर्याय निवडू शकतात. त्याशिवाय बँकेच्या इंटरनेट बँकिंग प्लॅटफॉर्मद्वारे पैसे भरताना ग्राहक त्यांचे उच्च मूल्य व्यवहार त्वरित आणि डिजीटल पद्धतीने ईएमआयमध्ये रूपांतरित करू शकतात. (icici bank launches instant emi facility on its internet banking platform)
संबंधित बातम्या –
महिन्याला फक्त गुंतवा 5000 आणि मिळवा 68 लाख, PNB ची धमाकेदार योजना
Gold Rate Today : 20 टक्क्यांनी स्वस्त झालं सोनं, पटापट चेक करा तुमच्या शहरातले ताजे दर
फक्त 700 रुपयामध्ये मिळेल LPG गॅस सिलेंडर, ‘हा’ आहे प्रोमो कोड
(icici bank launches instant emi facility on its internet banking platform)