तुम्हाला नवीन व्यवयाय सुरू करायचाय? तर जीएसटीबाबत जाणून घ्या ‘हे’ महत्त्वाचे नियम

| Updated on: Nov 30, 2021 | 6:45 AM

देशात जीएसटी वस्तू आणि सेवा कर लागू करण्यात आला आहे. जीएसटी अस्तित्वात आल्यापासून आपल्याला प्रत्येक वस्तू आणि सेवांवर एक विशिष्ट रक्कम कर म्हणून द्यावी लागते. पेट्रोल आणि डिझेल सारख्या काही गोष्टींना जीएसटी कक्षेच्या बाहेर ठेवण्यात आले आहे.

तुम्हाला नवीन व्यवयाय सुरू करायचाय? तर जीएसटीबाबत जाणून घ्या हे महत्त्वाचे नियम
जीएसटी
Follow us on

नवी दिल्ली : देशात जीएसटी वस्तू आणि सेवा कर लागू करण्यात आला आहे. जीएसटी अस्तित्वात आल्यापासून आपल्याला प्रत्येक वस्तू आणि सेवांवर एक विशिष्ट रक्कम कर म्हणून द्यावी लागते. पेट्रोल आणि डिझेल सारख्या काही गोष्टींना जीएसटी कक्षेच्या बाहेर ठेवण्यात आले आहे. जीएसटीची वसुली करण्यासाठी काही नियम बनवण्यात आले आहेत. तुम्ही जर व्यवसायिक असाल तर या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तुम्हाला कुठलाही व्यवसाय करण्यासाठी सर्वप्रथम जीएसटी नंबरची आवश्यकता असते, जर हा नंबर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात दंड होऊ शकतो.

जीएसटी नंबर का असतो महत्त्वाचा ?

देशात जीएसटी लागू  झाल्यानंतर प्रत्येक व्यवसायिकाला एक जीएसटी नंबर देण्यात आला आहे. भारतातील बहुतांश व्यवसायिकांकडे जीएसटी नंबर असतो. मात्र समजा तुमच्याकडे नसेल तर त्याचा तुम्हाला फटका बसू शकतो. कारण तुम्ही ज्याच्याकडून सामान खरेदी करणार आहात त्याच्याकडे जर जीएसटी नंबर असेल तर तुम्हाला त्याला जीएसटीचे पैसे द्यावेच लागतील. मात्र जर तुमच्याकडे जीएसटी नंबर नसेल, तर तुम्ही एखाद्या व्यक्तीला वस्तू विकणार असाला तर त्याच्याकडून तुम्हाला जीएसटीचे पैसे घेता येणार नाहीत. यासाठी जीएसटी नंबर महत्त्वाचा मानला जातो.

…तर होऊ शकतो कारवाई

जर तुमच्याकडे जीएसटी नंबर नसेल तरीही तुम्हाला तुम्ही ज्या व्यक्तीकडून वस्तू  खरेदी करणार आहात त्याला तुम्हाला जीएसटी द्यावाच लागेल, मात्र तुमच्याकडे जीएसटी नंबर नसल्याने तुम्हाला तुमच्या ग्राहाकांकडून जीएसटी वसूल करता येणार नाही. यामध्ये तुमचे मोठ्याप्रमाणात नुकसान होऊ शकते. ज्यांच्या व्यवसायाचा टर्नओव्हर हा वीस लाखांपेक्षा अधिक आहे, असे सर्व उद्योजक हे जीएसटीच्या कक्षेत येतात. अशा उद्योजकांना जीएसटी भरणे आवश्यक आहे. त्यांच्याकडे जीएसटी क्रमांक नसल्याचे आढळल्यास त्यांच्यावर मोठी आर्थिक कारवाई देखील होऊ  शकते. त्यामुळे जीएसटी नंबर हा व्यवसायातील एक अविभाज्य घटक ठरतो.

संबंधित बातम्या

Anil parab : हिवाळी अधिवेशनच्या तारखा ठरल्या, लसीकरणाचे दोन डोस घेतलेल्यांनाच अधिवेशनात प्रवेश

चिप संकटावर TATA चा मोठा निर्णय, ‘या’ 3 राज्यांमध्ये प्लांट उभारण्याची तयारी

एक डिसेंबरपूर्वी पटापट उरका ‘ही’ कामे; अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान