नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे लोकांच्या आयुष्यावर मोठा परिणाम झालाय. हा परिणाम आर्थिक पातळीवरही दिसलाय. कुणाचे पगार कमी झालेत, तर कुणाची नोकरीच गेलीय. अशात ज्या लोकांना नोकरीबाबत अडचण येऊन आर्थिक संकट आलंय त्यांना या काळात पीएफची मदत होऊ शकते. नोकरी गेलेले लोक आपल्या पीएफ अकाऊंटमधून काही प्रमाणात पैसे काढू शकतात. ईपीएफओकडून आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर याबाबत माहिती दिलीय (If you loose your job then can use your EPF refundable advance).
EPF Members can now avail Non-Refundable Advance in case of Unemployment.#EPFO #SocialSecurity #HumHainNa pic.twitter.com/sVQxQDYWiP
— EPFO (@socialepfo) June 11, 2021
ईपीएफचं खातं असलेले सदस्य बेरोजगार असताना नॉन रिफंडेबल अॅडव्हान्सचे पैसे वापरु शकतात. म्हणजेच त्यांना पीएफ खात्यावरुन पैसे वापरता येतील. विशेष म्हणजे हे पैसे कर्जाप्रमाणे परत करण्याचीही गरज नाही.
पीएफ खातेधारक आपल्या खात्यात जमा झालेल्या रकमेपैकी 75 टक्के पैसे काढू शकतात. ते नॉन रिफंडेबल असतील. ईपीएफओने या माध्यमातून बेरोजगारांना मदत करण्याचा आणि सोबतच त्यांचं पीएफ सदस्यत्व सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय.
पुढील महिन्यापर्यंत कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) जवळपास 6 कोटीहून अधिक सदस्यांना चांगली बातमी देऊ शकते. जुलै महिन्याच्या शेवटीपर्यंत EPFO आपल्या खातेधारकांच्या खात्यावर 8.5 टक्के दराने व्याज देणार आहे. EPFO च्या केंद्रीय मंडळाने मागील वर्षी सप्टेंबर महिन्यातच व्याज देण्याची घोषणा केली होती. ईपीएफओचे 6 कोटी सदस्य आहेत. त्यांना आर्थिक वर्ष 2020-21 साठी 8.5 टक्के व्याज मिळेल. मागील 8 वर्षातील हे सर्वात कमी व्याजदर आहे.
ज्या कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत ईपीएफ अकाउंट आधारशी लिंक केलेलं नाही त्यांना लवकर हे करावं लागेल. अन्यथा पीएफ खात्यावर पैसे जमा होणार नाहीत. यामुळे कर्मचाऱ्यांना पैसे काढण्यासाठी देखील अडचण येऊ शकते. इतकंच नाही तर आधार लिंक नसेल तर पीएफ खातेधारकाचा ECR देखील दाखल होणार नाही.
हेही वाचा :
व्हिडीओ पाहा :
If you loose your job then can use your EPF refundable advance