नवी दिल्ली : अमेरिकेतील बहूराष्ट्रीय (America) कुरिअर कंपनी फेडेक्सच्या सीईओपदी भारतीय वंशाचे राज सुब्रम्हण्यम (Raj Subramaniam ) यांची निवड झाली आहे. राज सुब्रम्हण्यम हे फ्रेडरिक वी स्मिथ यांच्याकडून पदभार स्वीकारतील, 1 जून 2022 पासून ते सीईओ पदाचा रारभार स्वीकारतील. 20202 मध्ये राज सुब्रम्हण्यम फेडेक्सच्या (Fedex) संचालक मंडळात दाखल झाले होते. राज सुब्रम्हण्यम सध्या फेडेक्स एक्स्प्रेसचे सीईओ म्हणून काम करत आहेत. फेडेक्स एक्स्प्रेस ही जगातील सर्वात मोठी एक्सप्रेस वाहतूक कंपनी आहे. सुब्रम्हण्यम यांनी फेडेक्स कंपनीचे चीफ मार्केटिंग अँड कम्युनिकेशन ऑफिसर म्हणून देखील काम केलं आहे. कॉर्पोरेट रणनीती ठरवण्याचं काम राज सुब्रम्हण्यम यांनी केलं आहे.
Adding to the list of Indian born CEO’S of global giants, Shri. Raj Subramaniam avl to join as a newly appointed CEO of “@FedEx“. He is replacing the Founder-CEO Frederick W Smith.
He hails from Trivandrum and studied at @iitbombay.
Congratulations & wishing him good luck! pic.twitter.com/9QrxgfmChk
— K.Annamalai (@annamalai_k) March 30, 2022
राज सुब्रम्हण्यम यांचं सध्याचं वय 56 वर्ष आहे. ते कॅनडामधील फेडेक्स एक्स्प्रेसचे अध्यक्ष आहेत. फेडेक्सला 1991 जॉईन झाल्यानंतर राज सुब्रम्हण्यम यांनी फेडेक्स कंपनीत वेगेवळ्या पदावर काम केलं आहे. फेडेक्सच्या मार्केटिंग आणि व्यवस्थापनात त्यांनी काम केलं आहे. फेडेक्स एक्स्प्रेस कंपनीत विविध पदावंर काम केल्यानंतर राज सुब्रम्हण्यम याची 2019 मध्ये फेडेक्स एक्स्प्रेसच्या सीओओ पदावर नियुक्ती करण्यात आली होती.
राज सुब्रम्हण्यम हे मूळचे केरळच्या थिरुवनंतपुरमचे आहेत. सध्या ते अमेरिकेतील टेनान्स प्रांतातील मेम्फिस मध्ये वास्तव्यास आहेत. आयआयटी मुंबईमध्ये त्यांनी केमिकल इंजिनिअरिंगमधून शिक्षण पूर्ण केलं आहे. तर, पदव्युत्तर पदवी देखील केमिकल इंजिनिअरिंगमध्ये घेतली आहे. टेक्सास विद्यापीठातून राज सुब्रम्हण्यम यांनी एमबीए पूर्ण केलं आहे. राज सुब्रम्हण्यम गेल्या 30 वर्षांपासून फेडेक्स कंपनीमध्ये कार्यरत आहेत. सुब्रम्हण्यम यांच्याकडे जागतिक पातळीवरील धोरण निश्चिती आणि कंपनीची रणनीती ठरवण्याचा अनुभव आहे.
फेडेक्स कंपनीचे डेविड स्टेनर यांनी राज सुब्रम्हण्यम हे कंपनीला मोठ्या उंचीवर घेऊन जातील असं म्हटलं आहे. फेडेक्स कंपनीचे जगभऱात 6 लाख कर्मचारी आहेत.