मुंबई : तुम्हालाही कमी कष्टात अधिकाधिक लोकांपर्यंत तुमचा व्यवसाय (Business) न्यायचा असेल तर गुगल तुमच्यासाठी मोठी संधी घेऊन आलंय. गुगलच्या काही ट्रिक्स वापरल्या तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अनेक लोकांपर्यंत पोहचू शकता. यासाठी Google My Business तुमची बरीच काफी मदद करू शकतो. यासाठी गुगल सर्च किंवा मॅपमध्ये माहिती अपडेट करणं हा सामान्यपणे वापरला जाणारा मार्ग आहे. मात्र, Google कडे तुमच्या बिजनेससाठी सर्च किंवा मॅपमध्ये कोणताही बदल न करता सर्चमध्ये दिसणारी माहिती एडिट करण्याचा पर्याय आहे (Important tricks to grow your business using Google features).
आता बिजनेस कॉन्टॅक्ट डिटेल आणि ओपनिंग टाईमसारखी माहिती सहज समाविष्ट किंवा एडिट करता येईल. तसेच ही माहिती थेट Google सर्चमधून अपडेट शेअर करण्यासाठी पोस्ट करता येणार आहे.
बिजनेससाठी Google पोस्ट बनवणे आणि ती प्रकाशित करणे आधी खूप कठिण काम होतं. मात्र, आता थेट SERPs च्या माध्यमातून असं करता येतं. Google My Business मध्ये पोस्ट पब्लिश करण्यासोबतच सर्च करण्यांना स्पेशल ऑफर आणि नव्या उत्पादनांची (प्रोडक्ट्स) माहिती देणंही शक्य आहे. पुढील आठवड्यापासून बिजनेस अपकमिंग इव्हेंटबाबत पोस्ट करता येणार आहे. यात हा इव्हेंट कधी आणि कोठे होणार आहे याची माहिती देता येणार आहे. हा इव्हेंट फक्त ऑनलाइन असेल तरी पोस्ट करता येणार आहे.
तुमचा व्यवसाय स्थानिक असेल आणि त्यात तुम्ही काही नवी सेवा देणार असला तर तुम्हाला येथे त्याची माहिती अपडेट करता येईल. यात ऑटो रिपेयर, हेयर स्टायलिंग अशा व्यवसायांचा समावेश होतो. ते ‘Edit Profile’ मध्ये जाऊन त्यांच्याकडील सेवा अपडेट करु शकतात.
Google फूड बिजनेसमध्ये Google सर्च आणि मॅपवर थेट बिजनेस प्रोफाईलच्या माध्यमातून टेकआउट आणि डिलीवरीच्या ऑर्डर घेता येतात.
गुगलच्या या सुविधेमुळे ग्राहकांना संबंधित दुकानात कोणत्या वस्तू किती प्रमाणात उपलब्ध आहेत याची माहिती मिळते. दुकानदाराला यासाठी मॅन्युअल माहिती टाकण्याची गरज पडत नाही. Pointy साठी साईन अप 30 सप्टेंबरपर्यंत मोफत आहे.
तुम्हालाही या सेवांचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या व्यवसायाच्या मेल आयडीवरन Google साठी लॉग इन करा. तेथून Google सर्चमध्ये आपल्या व्यवसायाचं नाव किंवा ‘My Business’ टाईप करा. किंवा Google मॅपवर ‘Your Business Profile’ वर क्लिक करु शकता.
Important tricks to grow your business using Google features