नवी दिल्ली : भारताचे टॉप अरबपती उद्योजक गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या जीवावरचे संकट कसे टळले याची माहिती त्यांनी दिली. त्यांनी मुंबई हल्ल्याशी संबंधित आठवण सांगितली. नोव्हेंबर 2008 साली मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात (26/11 Mumbai attacks) ते हॉटेल ताजमध्ये अडकले होते. पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबसह (Ajmal Kasab) त्याच्या साथीदाराने 26 नोव्हेंबर रोजी हल्ला केला होता. त्यात अनेक निरपराधांना जीव गमवावा लागला होता. मुंबई पोलिसांच्या जिगरबाज अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना या हल्ल्यात वीर मरण आले होते. पण जीवाची बाजी लावून अधिकाऱ्यांनी, कमांडोंनी दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. त्यात क्रुरकर्मा अजमल कसाब याला पकडण्यता आले होते.
गौतम अदानी यांनी इंडिया टीव्हीला याविषयीची मुलाखत दिली. त्यात त्यांनी दिवशीचा घटनाक्रम सांगितला. त्यानुसार, हॉटेल ताजमध्ये ते दुबईतील मित्रासोबत व्यवसायासंबंधीच्या एका बैठकीत होते. त्याचवेळी त्यांना कळले की हॉटेलवर दहशतवादी हल्ला झाला आहे.
लष्कर-ए-तोयबाने (lashkar-e-taiba) मुंबईतील काही ठिकाणांवर हल्ला केला होता. त्यात हॉटेल ताजचाही समावेश होता. अदानी यांनी सांगितले की, त्यांनी या हॉटेलमध्ये दहशतवाद्यालाही पाहिले होते. हा हल्ल्यात अनेकांना प्राण गमवावे लागेल. अनेकांच्या स्वप्नांची राख रांगोळी झाली.
दुबईहून मुंबईत आलेल्या मित्रासोबत अदानी यांनी एक बैठक संपवली. ते हॉटेलमधून बाहेर पडणार तेव्हा मित्रांनी दुसऱ्या बैठकीसाठी आग्रह धरला. त्यामुळे अदानी हे पुन्हा रेस्टॉरंटमध्ये थांबले. त्यांनी जेवण घेतले. त्यानंतर त्यांना दहशतवादी हल्ल्याची वार्ता कळली.
त्यानंतर त्यांनी कॉपी बोलवली आणि बैठकीला सुरुवात झाली. थोड्याच वेळात हॉटेलवर दहशतवादी हल्ला झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. काही मिनिटांतच हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना मागच्या दरवाजाने किचनमध्ये नेले. त्यानंतर त्यांना बाहेर नेण्यात आले.
26 नोव्हेबर 2008 रोजी मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला हा इतिहासातील सर्वात भयानक हल्ला होता. पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे घेऊन आलेल्या दहशतवाद्यांनी मुंबईत जीवघेणा हल्ला केला होता. यामध्ये 166 लोकांचा मृत्यू झाला तर 300 हून अधिक नागरिक जखमी झाले होते.