Marathi News Business In the mood for a walkout on Sunday? So fill the tank only by looking at the price of fuel, today the cheapest in this city, expensive petrol diesel is available in this place
Petrol Diesel Price Today : फिरण्याच्या मूडला घाला आवर, आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव माहिती आहे का?
Petrol Diesel Price Today : शनिवार, रविवार आणि सोबत जोडून आलेल्या 1 मेच्या सुट्यांमुळे अनेक जण सुट्टी एन्जॉय करण्यासाठी आता बाहेर पडतील. पण त्यापूर्वी आजचा इंधनाचा दर नक्की जाणून घ्या.
Ad
आजचा भाव काय
Follow us on
नवी दिल्ली : जागतिक बाजारात कच्चा तेलाने दोन दिवसांपासून पुन्हा उसळी घेतली आहे. इंधन जवळपास 2 डॉलरने वधारले आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला ओपेक प्लस देशांनी तेल उत्पादन घटविण्याचा निर्णय घेतला होता. 1 मे पासून त्यावर अंमलबजावणीच्या शक्यता आहे. चीनने झिरो कोविड धोरण गुंडाळल्याने तिथे इंधनाची मागणी वाढली आहे. त्यातच उत्पादन घटविण्याच्या निर्णयाने मोठा फटका बसणार आहे. कच्चा तेलाच्या किंमती भडकण्याची शक्यता आहे. जागतिक घडामोडींचा परिणाम लागलीच देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतींवर(Petrol Diesel Price) दिसून आला. पेट्रोलियम कंपन्यांनी सकाळी 6 वाजताच इंधनाचे दर जाहीर केले. शनिवार, रविवार आणि सोबत जोडून आलेल्या 1 मेच्या सुट्यांमुळे अनेक जण सुट्टी एन्जॉय करण्यासाठी आता बाहेर पडतील. पण त्यापूर्वी आजचा इंधनाचा दर नक्की जाणून घ्या.
कच्चा तेलाची उसळी
आज 30 एप्रिल रोजी कच्चा तेलाने उसळी घेतली. डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) 2.50 टक्क्यांनी वधारले. हा भाव 76.63 डॉलर प्रति बॅरल तर ब्रेंट क्रूड ऑईल (Brent Crude Oil) वधारुन 80.26 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले.