नवी दिल्ली: इन्कम टॅक्स डिपार्टमेंट (Income Tax Department) ने या आठवड्यात परदेशात पैसे पाठवणाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. आयकर विभागानं काही फॉर्म बँकेत जाऊन हातानं भरण्याची परवानगी दिली आहे. 7 जूनला इन्कम टॅक्स विभागनं नवीन पोर्टल लाँच केलं होतं. त्यानंतर पोर्टलमधील काही तांत्रिक अडचणींमुळे इन्कम टॅक्स विभागानं एक परिपत्रक जारी केलं आहे. त्यापत्रकानुसार परदेशात पैसे पाठवणारे व्यक्ती 30 जूनपर्यंत फॉर्म 15CA/15CB बँकामध्ये भरू शकतात. ही सुविधा ऑफलाईन पद्धतीनं सुरु करण्यात आली आहे. नवीन पोर्टलचं काम सुरु झाल्यानंतर हे फॉर्म ई-फायलिंग पोर्टलवर अपलोड केले जातील. (Income tax alert cbdt relaxes e filing rule for submitting forms 15ca 15cb for foreign remittances)
नवीन पोर्टल www.incometax.gov.in 7 जूनला सुरु करण्यात आलं होतं. इन्कम टॅक्स विभागानं करदात्यांना इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करताना सोपी आणि सुलभ प्रक्रिया असावी यासाठी नवीन पोर्टल लाँच केलं आहे. नवीन पोर्टल लाँच केल्यानंतर सुरुवातीपासून त्यामध्ये काही समस्या पुढे आल्या आहेत. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी इन्फोसिसच्या नंदन निलेकणी यांच्याकडे तक्रार केली होती. चार्टर्ड अकाऊंटंटने दिलेल्या माहितीनुसार करदाते त्यांनी गेल्या वर्षांमध्ये भरलेले इन्कम टॅक्स रिटर्न पाहू शकत नाहीत. सध्या नव्या पोर्टलवरील काही सुविधा बंद आहेत. असून त्यावर कमिंग सून असा उल्लेख करण्यात आला आहे.
इन्कम टँक्स डिपार्टमेंटने ट्विट करुन माहिती शेअर केली आहे. करदाते आणि परदेशात पैसे पाठवणाऱ्या व्यक्तींनी इन्कम टॅक्स फार्म 15सीए/15सीबी (15CA/15CB) हा फॉर्म पोर्टलवर भरताना अडचणी येत असल्याचं सांगितलं. यामुळे करदात्यांना 15 सीए/ 15 सीबी हे फॉर्म बँकांमध्ये जाऊन ऑफलाईन पद्धतीनं भरण्यास परवानगी देण्यात आली आहे.
IT डिपार्टमेंटनं अधिकृत डीलर्स परदेशात पैसे पाठवण्यासाठी हा अर्ज स्वीकारतील असं सांगितलं. परदेशात पैसे पाठवण्यासाठी 30 जून 2021 पर्यंत 15सीए/15सीबी हा फॉर्म मॅन्युअल पद्धतीनं स्वीकारला जाईल. हे फॉर्मनंतर पोर्टलवर अपलोड केले जातील.
CBDT grants relaxation in electronic filing of forms 15CA & 15CB in view of difficulties reported by taxpayers in filing of forms online on the new e-filing portal https://t.co/GYvO3n9wMf. The forms can be submitted in manual format to the authorised dealers till 30th June, 2021. pic.twitter.com/tQPn10HG03
— Income Tax India (@IncomeTaxIndia) June 14, 2021
संबंधित बातम्या:
PNB बँकेची जबरदस्त ऑफर, स्वस्तात घर खरेदीचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार
Income tax alert cbdt relaxes e filing rule for submitting forms 15ca 15cb for foreign remittances