Income tax saving tips: आयकर वाचवण्याचा अनेक पर्यायांचा शोध सर्वसामान्य व्यक्ती घेत असतात. त्यासाठी सीएचा सल्लाही घेतला जातो. पत्नीच्या खात्यात पैसे टाकण्याचा एका पर्यायावर चर्चा होत असते. याबाबची ट्रिक वापरुन आयकर वाचवता. पत्नीच्या खात्यावर पैसे टाकून कर वाचवण्याचा पद्धतीला ‘क्लबिंग’ म्हटले जाते. जर तुम्ही पत्नीच्या नावाने काही गुंतवणूक केली, तिच्या खात्यात पैसे टाकले तर त्याचे काही फायदे होऊ शकतात. त्यासाठी हा पूर्ण नियम काय आहे, हे जाणून घेणे महत्वाचे आहे.
आयकर नियम 60 ते 64 नुसार, जर तुम्ही तुमच्या पत्नीच्या खात्यात पैसे टाकले आणि त्यापासून काही उत्पन्न मिळाले (जसे व्याज, घरभाडे, डिव्हिडंड) तर ते तुमच्या एकूण उत्पन्नात जोडले जाते. त्यावर कर लागतो. त्याला क्लबिंग पर्याय म्हटले जाते. परंतु तुम्ही तुमच्या पत्नीला रक्कम भेट दिली तर त्यावर कोणताही कर लागत नाही. मात्र, त्यावरुन मिळणाऱ्या नफ्यावर क्लबिंग नियम लागू असणार आहे.
तुमच्या पत्नीचे उत्पन्न कमी आहे किंवा उत्पन्न नाही तर तुम्ही तिच्या नावावर गुंतवणूक करु शकतात. मुदत ठेव, म्यूचुअल फंड, भविष्य निर्वाह निधी यासारख्या गुंतवणूक पर्याय तुम्ही वापरु शकतात. त्यावरुन मिळणाऱ्या उत्पन्नावर कमी कर लागेल.
पत्नीच्या नावावर घर असेल तर तुम्ही तिला भाडे देऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला घरभाडे भत्ता (एचआरए) साठी क्लेम करता येईल. त्यामुळे तुमच्या करातील रक्कम कमी होईल.
पत्नीच्या बचत खात्यात पैसे वर्ग करता येतात. त्यामुळे बचत खात्यातून मिळणाऱ्या व्याजाच्या रक्कमेतील उत्पन्नापासून तुम्ही वाचू शकतात. बचत खात्यातील व्याजावर दहा हजारांपर्यंत सूट आहे.