Marathi News Business Income Tax Department Be careful Do you also get income tax messages Don't fall into the trap of refund SMS by mistake
सावधान! तुम्हालाही आयकराचे मेसेज येतायत? चुकूनही रिफंड SMSच्या फंदात पडू नका, अन्यथा…
खरं तर आयकर विभाग आयकर परताव्यासाठी तुमचा क्रेडिट किंवा डेबिट कार्ड नंबर शेअर करण्याबद्दल कधीही बोलत नाही. तसेच आयकर विभागाने तुमचा CVV नंबर आणि OTP मागत नाही. त्यामुळे तुम्हाला कधी असे मेसेज किंवा ईमेल आले तर समजून जा ही फसवणूक आहे.
1 / 5
सध्याच्या काळात सायबर फ्रॉड मोठ्या प्रमाणात वाढले असून, लोकांना लुटण्याची एकही संधी हे हॅकर्स सोडत नाहीत, ते फक्त तुमची दिशाभूल करून फसवणूक करतात आणि गायब होतात. त्यामुळे सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे. खरं तर आयकर विभाग आयकर परताव्यासाठी तुमचा क्रेडिट किंवा डेबिट कार्ड नंबर शेअर करण्याबद्दल कधीही बोलत नाही. तसेच आयकर विभागाने तुमचा CVV नंबर आणि OTP मागत नाही. त्यामुळे तुम्हाला कधी असे मेसेज किंवा ईमेल आले तर समजून जा ही फसवणूक आहे.
2 / 5
आयकर विभागाच्या नावाने रिफंड मेसेजवर तुमचा कोणताही तपशील देऊ नका. तसेच जर या मेसेजमध्ये किंवा ईमेलमध्ये लिंकवर क्लिक करा, असे म्हटले असेल तर ते टाळा. आयकर विभागाकडून असे मेसेज पाठवले जात नसल्यामुळे स्वतः आयकर विभागाने लोकांना अशा मेसेजपासून सावध राहण्यास सांगितले. यासोबतच एक ट्विटही जारी करण्यात आले, ज्यामध्ये अशा कोणत्याही मेसेजवर प्रतिक्रिया देण्यापूर्वी ते नीट तपासण्याच्या सूचना देण्यात आल्यात.
3 / 5
4 / 5
करदात्यांनी मालमत्ता कर तात्काळ जमा करण्याचे ठाणे महापालिकेचे आवाहन
5 / 5
जर तुम्ही थोडे सावध असाल तर तुम्ही स्वतःही असे फसवे मेसेज शोधू शकता. जर मेसेज किंवा ई-मेल फसवणूक करून पाठविला गेला असेल. त्यामुळे एसएमएस किंवा मेल पाठवणाऱ्याचे नाव तपासणे आवश्यक असल्याचे आयकर विभागाने म्हटलेय. तसेच आयकर वेबसाईटचे चुकीचे स्पेलिंग किंवा चुकीचे हेडर बनावट ई-मेलमध्ये दिलेले असते. त्यामुळेच त्यांनी ट्विटद्वारे योग्य URL देखील दिलीय, जेणेकरून तुम्हाला समजण्यास अडचण येऊ नये. त्यामुळे असे फसवे मेसेज नेहमी टाळण्याचा प्रयत्न करा.