नवी दिल्ली: आयकर विभागानं नवी वेबसाईट 7 जूनला लाँच केली. इन्कम टॅक्स विभागानं सोमवारी रात्री या वेबसाईटचं लाँचिंग केलं. आयटीआर फाईल करणे, इन्कम टॅक्स रिटर्न प्रक्रिया सोपी आणि जलद बनवण्यासाठी नवीन पोर्टल लाँच करण्यात आलं मात्र, पहिल्याचं दिवशी पोर्टल डाऊन असल्यानं करदात्यांनी संताप व्यक्त केला. पहिल्याच दिवशी पोर्टल डाऊन झाल्यानं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी ट्विटद्वारे इन्फोसिस आणि नंदन निलेकणी यांच्याकडे संताप व्यक्त करत उत्तर मागितलं आहे. (Income tax department new portal flop on first day finance minister Nirmala Sitharaman tags infosys and Nandan Nilekani)
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नवीन पोर्टल डाऊन झाल्याबद्दल संताप व्यक्त करत इन्फोसिसला जाब विचारला आहे. बहुप्रतिक्षित ई-फायलिंग पोर्टल 2.0 सोमवारी रात्री 20.45 वाजता लाँच केलं आहे. नव्या पोर्टलबद्दल अनेक अडचणी समरो आल्या आहेत. इन्फोसिस आणि नंदन निलेकणी तुमच्याकडून दिली जाणारी सेवा गुणवत्तापूर्ण असेल. तुम्ही आमच्या करदात्यांना निराश करणार नाही, अशी आशा देखील सीतारमण यांनी व्यक्त केली.
The much awaited e-filing portal 2.0 was launched last night 20:45hrs.
I see in my TL grievances and glitches.
Hope @Infosys & @NandanNilekani will not let down our taxpayers in the quality of service being provided.
Ease in compliance for the taxpayer should be our priority. https://t.co/iRtyKaURLc
— Nirmala Sitharaman (@nsitharaman) June 8, 2021
इन्कम टॅक्स विभागानं नव्या पोर्टलच्या निर्मितीची आणि त्याच्या देखभालीची जबाबादारी इन्फोसिस कंपनीला दिली आहे. त्यामुळे वेबसाईटमध्ये आल्या त्रुटी दूर करण्यासाठी निर्मला सीतारमण यांनी नंदन निलेकणि यांना लक्ष घालण्याचं आवाहन केलं आहे.
इन्कम टँक्स विभागानं यापूर्वी नवीन पोर्टल 7 जूनला सकाळी लाँच करणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे पोर्टल 7 जूनला रात्री लाँच करण्यात आलं. पोर्टल लाँच झाल्यानंतरही ग्राहकांना अडचणीला सामोरं जावं लागलं आहे. इन्कम टॅक्स विभागाचं जून पोर्टल 1 ते 6 जून दरम्यान बंद ठेवण्यात आलं होतं.
संबंधित बातम्या:
EPF खात्याला आधार कार्डसोबत लिंक करा, अन्यथा आर्थिक नुकसान सहन करावं लागणार
कोरोना लस घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी, ‘या’ बँकेचा मुदत ठेवीवर अधिक व्याज देण्याचा निर्णय
Income tax department new portal flop on first day finance minister Nirmala Sitharaman tags infosys and Nandan Nilekani