ITR फाईल करताना केलेली चूक सुधारण्याची करदात्यांना संधी; अशी करा ऑनलाईन दुरुस्ती

| Updated on: Jun 30, 2024 | 4:02 PM

Revised ITR : आयकर रिटर्न फाईल करताना चुका होणे स्वाभाविक आहे. ही चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ऑनलाईन आयटीआर रिव्हाईज करु शकता. पण त्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आयटीआर भरताना पण काळजी घेणे आवश्यक असते.

ITR फाईल करताना केलेली चूक सुधारण्याची करदात्यांना संधी; अशी करा ऑनलाईन दुरुस्ती
Revise ITR
Follow us on

आयकर रिटर्न दाखल करण्याची मुदत (ITR Last Date) 31 जुलै आहे. आयकर विभागाच्या संकेतस्थळानुसार, 29 जून, 2024 रोजीपर्यंत 1,37,92,552 आयटीआर दाखल करण्यात आले आहे. त्यातील 12905361 रिटर्न व्हेरिफाईड झाली आहे. तर 3937293 आयटीआर प्रक्रियेत आहे. रिटर्न फाईल करताना बिनचूक असण्याचा प्रयत्न होतो. पण तरीही करदात्यांकडून एखादी चूक होते. बँक खात्याची चुकीची माहिती अथवा, व्याजाची रक्कम देण्यास विसर पडतो अथवा इतर किरकोळ चूक होते. पण त्यामुळे घाबरुन जाण्याची गरज नाही. तुम्ही आयटीआरमध्ये एखादी चुकीची माहिती जमा केल्यास या चुका तुम्हाला ऑनलाईन सुधारता येतात.

कितीवेळा करता येतो बदल

आयकर अधिनियम, 1961 चे कलम 139(5) नुसार, जर एखाद्या करदात्याला रिटर्न दाखल केल्यावर माहिती होते की त्याने काही तरी चूक केली आहे तर त्याला चुका दुरुस्त करता येतात. सुधारीत आयटीआर (Revised ITR) दाखल करता येतो. जर आयटीआर दाखल करताना काही चूक झाली तर लागलीच आयटीआर दाखल करा. आता अनेकांना प्रश्न पडला असेल की कितीवेळा आयटीआर रिटर्नमध्ये चुकीची दुरुस्ती करता येते. तर निर्धारीत वेळेत तु्म्ही जितक्या चुका केल्या असतील त्या दुरुस्त करता येतात.

हे सुद्धा वाचा

सत्यापित करायला विसरु नका

जर तुम्ही आयटीआर दुरुस्ती केली. त्यात सुधारणा केली. तर एका गोष्टीचे लक्ष ठेवा. आयटीआर रिव्हाईज केल्यावर ते सत्यापित करायला विसरु नका. नाहीतर आयकर विभाग ही दुरुस्ती स्वीकारणार नाही आणि तुमचे रिव्हाईज आयटीआर अमान्य होईल.

चूक अशी दुरुस्त करा ऑनलाईन

आयकर खात्याची साईट https://www.incometax.gov.in/iec/foportal/ वर जा

ई-फाईल मेन्यूवर जाऊन रेक्टिफिकेशन लिंकवर क्लिक करा

‘Order/Intimation to be rectified’ अथवा ड्रॉपडाऊन यादीत मूल्यांकन वर्ष निवडा. त्यानंतर पुढ सुरु ठेवा या पर्यायावर क्लिक करा.

आता ड्रॉप डाऊन यादीत रिक्वेस्ट टाईप निवडा. यामध्ये टॅक्स क्रेडिट मिसमॅच करेक्शन ओनली वा रिटर्न डेटा करेक्शन यातील ज्यात बदल करायचा तो पर्याय निवडा. माहिती अपडेट केल्यावर सबमिट बटणावर क्लिक करा. एक सक्सेस मॅसेज दिसेल. तुमच्या नोंदणीकृती ई-मेल आयडीवर याविषयीचा एक मेल पण येईल.