नवी दिल्लीः Income Tax Return (ITR): जर तुम्ही तुमचा आयकर परतावा (ITR) पडताळण्यासाठी ऑनलाईन पद्धतींचा वापर करू शकत नसाल तर तुमच्याकडे ITR-V भौतिकरीत्या पाठवण्याचा पर्याय देखील आहे. एखाद्याला ITR-V ची प्रिंटआऊट घेऊन ती प्राप्तिकर विभागाकडे पाठवावी लागते. सीपीसी, पोस्ट बॉक्स क्रमांक -1, इलेक्ट्रॉनिक सिटी पोस्ट ऑफिस, बंगलोर- 560100, कर्नाटक, भारत- येथे या पत्त्यावर स्वाक्षरीखाली पाठवायचे आहे.
ITR दाखल केल्यानंतर 120 दिवसांच्या आत पडताळणी करणे आवश्यक आहे. म्हणून जर तुम्ही तुमच्या आयटीआरची पडताळणी करण्यासाठी फिजिकल पद्धत वापरत असाल, तर ते आयकर विभागाकडे वेळेवर पोहोचले आहे, याची खात्री करा. जर ते वेळेवर खात्यापर्यंत पोहोचले नाही, म्हणजे दाखल केल्याच्या 120 दिवसांच्या आत तर तुमचा परतावा पडताळला जाणार नाही आणि रिटर्न भरण्याची प्रक्रिया देखील पूर्ण होणार नाही.
टप्पा 1: सर्वप्रथम या लिंकवर जा https://www.incometax.gov.in/iec/foportal.
टप्पा 2: मुख्यपृष्ठावर, ‘आमच्या सेवा’ विभागात खाली स्क्रोल करा. या विभागांतर्गत प्राप्तिकर परतावा (ITR) स्थिती तपासा.
टप्पा 3: त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पान उघडेल. आयटीआर दाखल केल्याचा पावती क्रमांक आणि आयटीआर दाखल करताना तुम्ही प्रविष्ट केलेला मोबाइल क्रमांक टाकावा लागेल.
टप्पा 4: एकदा हे तपशील प्रविष्ट केले की, वन टाइम पासवर्ड (OTP) तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर SMS द्वारे पाठवला जाईल. लक्षात ठेवा OTP केवळ 15 मिनिटांसाठी वैध असेल. ओटीपी एंटर करा आणि सबमिटवर क्लिक करा.
एकदा ओटीपी प्रविष्ट केल्यानंतर आयटीआरची सद्य स्थिती प्रदर्शित केली जाईल. जर आयटीआर-व्ही आयकर खात्यापर्यंत पोहोचला असेल, तर स्थिती ‘आयटीआर पडताळणी’ म्हणून दर्शवली जाईल. जर तुम्ही अद्याप कर विभागापर्यंत पोहोचले नाही, तर ‘ई-पडताळणीसाठी प्रलंबित’ स्थिती म्हणून दिसेल. या व्यतिरिक्त एकदा आयकर विभागाला आयटीआर-व्ही प्राप्त झाल्यानंतर आपल्याला ईमेल किंवा एसएमएसद्वारे खातरजमा केली जाईल. जर तुमचा ITR सत्यापित झाला असेल. त्यानंतर ITR ची प्रक्रिया सुरू होईल.
संबंधित बातम्या
Fact Check : सरकार नवीन योजनेंतर्गत लोकांना चार हजार देणार? नेमकं तथ्य काय?
HDFC Bank छोट्या उद्योगांना कर्ज देणार, कोरोनाच्या नुकसानीतून व्यावसायिकांना सावरणार