Indian Economy GDP : चिंता वाढवणारी बातमी, GDP मध्ये घसरण, भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला

| Updated on: Aug 31, 2024 | 11:15 AM

Indian Economy GDP : एप्रिल ते जून या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला आहे. अंदाजित आकड्यापेक्षा GDP चा ग्रोथ रेट कमी दिसून आलाय. भारतीय अर्थव्यवस्थेकडे जगातील वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून पाहिलं जातं.

Indian Economy GDP : चिंता वाढवणारी बातमी, GDP मध्ये घसरण, भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला
Indian Market
Follow us on

भारताच्या GDP ग्रोथ रेटमध्ये घसरण झालीय. मागच्या पाच महिन्यात जून तिमाहीत जीडीपी ग्रोथ रेट खूपच कमी आहे. एप्रिल-जून 2024 तिमाहीत भारताच्या जीडीपी ग्रोथ रेटमध्ये 6.7 टक्के नोंद झाली. मागच्यावर्षी याच तिमाहीत ग्रोथ रेट 8.2 टक्के होता. वित्त वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाहीत जीडीपीमध्ये 6.7 टक्के वृद्धीचा अंदाज आहे. वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत 8.2% वाढ झाली होती. वित्त वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाहीत जीडीपीत नाममात्र 9.7% वाढ दिसली. वित्त वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत 8.5% वाढ झालेली. वित्त वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाहीत वास्तविक GVA मध्ये 6.8% वाढ झाली. मागच्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 8.3% टक्के वाढ झालेली.

MoSPI डेटानुसार, चालू वित्त वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाहीत भारताचा GDP विकास दर कमी होऊन 6.7% टक्के झाला. लोकसभा निवडणुकीनंतर सरकारी खर्च कमी झाल्याने भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास धीमा होईल असे अर्थतज्ज्ञांचा अंदाज होता. भारत जगातील वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेचा टॅग कायम ठेवील, असा तज्ज्ञांच म्हणणं आहे.

कुठल्या क्षेत्रात चांगली वाढ?

भारतात कृषी आणि खाणकाम ही दोन महत्त्वाची क्षेत्र आहेत. त्यात घट झालीय. कृषी क्षेत्रात एप्रिल-जून 2024 तिमाहीत ग्रोथ कमी होऊन 2 टक्के झाला. फिस्कल ईयर 2024 च्या पहिल्या तिमाहीत हाच ग्रोथ रेट 3.7 टक्के होता. इलेक्ट्रिसिटी सेक्टरमध्ये ग्रोथ जून तिमाहीत 10.4 टक्के राहीला. उत्पादन, पब्लिक एडमिन एंड सर्विस आणि कंस्‍ट्रक्‍शन या सेक्टरमध्ये चांगली वाढ झालीय.

RBI चा ग्रोथ रेट बद्दलचा अंदाज काय?

देशाची केंद्रीय बँक भारतीय रिजर्व बँकने (RBI) वित्त वर्ष 2024-25 साठी जीडीपी ग्रोथ रेटचा 7.2 टक्के अंदाज लावला होता. आरबीआयने एमपीसी बैठकीनंतर सांगितलेलं की, एप्रिल-जून 2024 तिमाहीत जीडीपी ग्रोथ 7.1 टक्के राहीलं. हा ग्रोथ रेट कमी होऊन 6.7 टक्के झाला. Q2 साठी 7.2 टक्के, Q3 साठी 7.3 टक्के आणि Q4 साठी जीडीपी ग्रोथ अंदाज 7.2 टक्के आहे.