Marathi News Business India has set a new record, there has been no big increase in the price of petrol diesel for the last 11 months, and the condition of the people has not been like Pakistan, Sri Lanka
Petrol Diesel Price Today : येस, गेल्या 11 महिन्यांचा असाही रेकॉर्ड! पेट्रोल-डिझेलमध्ये नाही झाली मोठी दरवाढ
Petrol Diesel Price Today : देशात काँग्रेसच्या काळात पेट्रोल-डिझेलने 60 रुपयांचा टप्पा ओलांडला होता. तर मोदी सरकारच्या काळात भाव जवळपास दुप्पट झाले आहेत. पण गेल्या 11 महिन्यांत या सरकारने नवीन रेकॉर्ड केला आहे.
Ad
दरवाढ नाही, भाव काय
Follow us on
नवी दिल्ली : जागतिक बाजारपेठेत कच्चा तेलाने (Crude Oil Price) अनेक उलटफेर पाहिले. 140 डॉलर प्रति बॅरलपर्यंत कच्चा तेलाने मजल मारली. तर ते पार 74 डॉलर प्रति बॅरलच्या ही निच्चांकी पातळीवर जाऊन आले. आता पुन्हा क्रूड ऑईलने उचल खाल्ली आहे. मे महिना आता दोन-तीन दिवसांवर आहे. हा महिना सर्वच दृष्टीने महत्वपूर्ण आहे. कारण ओपेक प्लस संघटनने कच्चा तेलाचे उत्पादन घटविण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्याची अंमलबजावणी आता सुरु होईल. तर गेल्या वर्षी 22 मे रोजी केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) ऐतिहासिक निर्णय घेतला होता. पेट्रोल-डिझेलवरील (Petrol Diesel Price)उत्पादन शुल्कात कपातीचा निर्णय झाला होता. त्यानंतर देशात इंधन किंमती न वाढण्याचा नवीन रेकॉर्ड झाला आहे.
रोषानंतर नरमले सरकार
काँग्रेसच्या काळात देशात पहिल्यांदा पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी प्रति लिटर 60 रुपयांचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर मोदी सरकारच्या काळात इंधनाचे दर सूसाट सूटले. हा हा म्हणता म्हणता किंमती प्रति लिटर 100 रुपयांच्या घरात आणि पुढे तर थेट 120 रुपयांच्या टप्प्यात इंधन जाऊन बसले. जनतेने प्रचंड रोष व्यक्त केला. त्यानंतर मोदी सरकार नरमले. केंद्र सरकारने गेल्या वर्षी 22 मे रोजी उत्पादन शुल्क घटविले. काही राज्यांनी पण मूल्यवर्धित करात कपात केली. पण त्यानंतर आतापर्यंत पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी दरवाढ झाली नाही. गेल्या 11 महिन्यांपासून हा रेकॉर्ड अबाधित आहे.
कच्चा तेलात नरमाई
आज 28 एप्रिल रोजी कच्चा तेलाच्या किंमतीत दरवाढ झाली नाही. किंमती नरमल्या. डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) 74.74 डॉलर प्रति बॅरल तर ब्रेंट क्रूड ऑईल (Brent Crude Oil) 78.39 डॉलर प्रति बॅरलवर होते.