satellite internet india: रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि टेसला मोटर्सचे संचालक एलन मस्क एका व्यवसायात स्पर्धक म्हणून समोरासमोर आले आहे. एलन मस्क यांनी या क्षेत्रात भारतात गुंतवणूक हवी आहे. परंतु मुकेश अंबानी या क्षेत्रातील भविष्यातील मागणी लक्षात घेऊन आपले वर्चस्व निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. 2030 पर्यंत हे क्षेत्र 16000 कोटींवर जाणार आहे. भारतातील सॅटेलाइट इंटरनेटवर वर्चस्व मिळवण्यासाठी दोन्ही उद्योजक समोरासमोर आले आहे.
मुकेश अंबानी यांनी केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी इंटरनेटसाठी स्पेक्ट्रमचा लिलाव करताना निष्पक्ष स्पर्धा असावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. भारत जगात सर्वाधिक इंटरनेट वापरणारा दुसरा क्रमांकाचा देश आहे. पहिल्या क्रमांकावर चीनचा क्रमांक आहे. यामुळे इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांचे लक्ष भारताकडे लागले आहे. डेलोइटनुसार, 2030 पर्यंत भारतातील 36 टक्के इंटरनेट मार्केट वाढणार आहे. म्हणजे भारताचे मार्केट 1.9 अब्ज डॉलरवर जवळपास 16 हजार कोटी रुपयांवर जाणार आहे. या मार्केटवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी मुकेश अंबानी आणि एलन मस्क समोरासमोर आले आहेत.
16 हजार कोटी रुपयांच्या व्यवसायावर केवळ अंबानी आणि मस्क यांचाच डोळा नाही तर देशातील आणि जगातील अनेक कंपन्या भारतातील सॅटेलाइट इंटरनेटच्या क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी इच्छूक आहेत. त्यामध्ये Amazon चे Quiper आणि भारती एजंटप्राईजेसचे OneWeb चाही समावेश आहे. तसेच इतर कंपन्यांचे लक्ष सरकारच्या निर्णयाकडे लागले आहे.
देशात सॅटेलाइट इंटरनेटला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहे. अंतराळात उपस्थित असलेल्या उपग्रहांद्वारे उपग्रह इंटरनेट वितरित केले जाणार आहे. त्यासाठी सरकारने अंतराळ क्षेत्रात एफडीआयचा मार्ग खुला केला आहे. त्यामुळे खासगी कंपन्यांना निधीची कमतरता भासणार नाही.