नवी दिल्ली : कोरोनानंतर आता युक्रेन आणि रशियामधील (Russia Ukraine Crisis) ताणलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीतही भारतानं (Government of India) एक महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे. पहिल्यांदाच देशानं निर्यातीचं आपलं निर्धारीत लक्ष्य गाठलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी याबाबतची माहिती ट्वीट करत दिली आहे. तब्बल 400 अब्ज डॉलरच्या वस्तूंच्या निर्यातीचं लक्ष्य गाठण्यात भारताला यश आलं आहे. पहिल्यांदा भारतात निर्यातीमधील हा विक्रमी आकडा गाठण्यात यश आलं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या यशाबद्दल मोदींनी देशातील वेगवेगळ्या क्षेत्रातील योगदान दिलेल्यांचे आभारही मानले आहेत. शेतकरी, उत्पादक, निर्यातदार, एमएसएमई क्षेत्रातील लोकांनी केलेल्या मेहनतीमुळे आणि कामगिरीमुळे हे लक्ष्य गाठता आलं असल्याचा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे. आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीकोनातून गाठलेला हा एक मैलाचा दगड आहे, असंही मोदींनी म्हटलंय.
भारत सरकारनं चारशे अब्ज डॉलरच्या निर्यातीचं लक्ष्य निश्चित केलं होतं. हे लक्ष्य भारतानं निर्धारीत वेळेच्या 9 दिवस आधीच पूर्ण केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत दररोज जवळपास एक अब्ज डॉलर्स किंमतीच्या वस्तूंची निर्यात करतो. जवळपास 46 दशलक्ष डॉलर किंमतीचा माल दररोज वेगवेगळ्या देशात निर्यात केला जात असल्याचीही माहिती समोर आली आहे.
सरकारकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार कोणत्या गोष्टींची किती निर्यात झाली, त्यावरही एक नजर टाकुयात..
एकीकडे निर्यातीचं टार्गेट जरी पूर्ण झालं असलं तरिही रशिया-युक्रेन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या आणि इतर वस्तूंच्या किंमती या वाढलेल्या आहेत. वाढत्या व्यापार तुटीबद्दल जाणकारांनी चिंता व्यक्त केली आहे.
India set an ambitious target of $400 Billion of goods exports & achieves this target for the first time ever. I congratulate our farmers, weavers, MSMEs, manufacturers, exporters for this success.
This is a key milestone in our Aatmanirbhar Bharat journey. #LocalGoesGlobal pic.twitter.com/zZIQgJuNeQ
— Narendra Modi (@narendramodi) March 23, 2022
एकीकडे पाच राज्यांतील निवडणुकांच्या दरन्यान गॅसचे दर वाढलेले नव्हते. दरम्यान, निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर पुन्हा एकदा घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे देशभरात गॅस सिलिंडरच्या किंमती 950 ते 1000 रुपयांवर पोहोचल्या आहेत. दरम्यान, आता घाऊक डिझेल खरेदीत 25 रुपयांची वाढ केल्यामुळे रेल्वे प्रवासही महागण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.
एफडीमध्ये गुंतवणूक करायचीये? या दहा बँकांबद्दल जाणून घ्या ज्या देतात सर्वोत्तम व्याज
Ajit Pawar : व्यापाऱ्यांना ‘अभय’, 10 हजार रुपयांची थकबाकी माफ; राज्य सरकारचा मोठा निर्णय