सौरउर्जेच्या क्षेत्रात भारताची मोठी झेप; अवघ्या सात वर्षांमध्ये क्षमतेत 17 पट विस्तार

| Updated on: Nov 08, 2021 | 6:47 AM

पर्यावरण मंत्रालयातील सल्लागार/शास्त्रज्ञ जे.आर. भट्ट म्हणाले की, भारत जागतिक लोकसंख्येच्या 17 टक्के प्रतिनिधित्व करतो परंतु आमचे एकूण उत्सर्जन केवळ चार टक्के आहे आणि सध्याचे वार्षिक हरितगृह वायू (GHG) उत्सर्जन केवळ 5 टक्के आहे.

सौरउर्जेच्या क्षेत्रात भारताची मोठी झेप; अवघ्या सात वर्षांमध्ये क्षमतेत 17 पट विस्तार
Follow us on

नवी दिल्ली: भारताने रविवारी संयुक्त राष्ट्र (UN) हवामान शिखर परिषदेत सांगितले की, देशाची सौर ऊर्जा क्षमता गेल्या सात वर्षांत 17 पटीने वाढून 45,000 मेगावॅट इतकी झाली आहे. भारतात जगातील 17 टक्के लोकसंख्या असूनही कर्ब उत्सर्जन जगातील एकूण उत्सर्जनाच्या केवळ चार टक्के असल्याचे भारताकडून सांगण्यात आले. COP-26 क्लायमेट समिटमध्ये 11 व्या शेअरिंग ऑफ आयडियाज (FSV) दरम्यान तिसरा द्विवार्षिक अपडेटेड रिपोर्ट (BUR) भारताकडून सादर करण्यात आला.

या अहवालात नमूद केल्यानुसार भारताने 2005-14 या कालावधीत आपल्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (GDP) उत्सर्जनाच्या तीव्रतेत 24 टक्क्यांनी कपात केली आहे. तसेच सौर कार्यक्रमातही लक्षणीय वाढ नोंदवली आहे. भारताच्या वतीने, पर्यावरण मंत्रालयातील सल्लागार/शास्त्रज्ञ जे.आर. भट्ट म्हणाले की, भारत जागतिक लोकसंख्येच्या 17 टक्के प्रतिनिधित्व करतो परंतु आमचे एकूण उत्सर्जन केवळ चार टक्के आहे आणि सध्याचे वार्षिक हरितगृह वायू (GHG) उत्सर्जन केवळ 5 टक्के आहे.

सौरउर्जेच्या क्षमतेत वाढ

गेल्या सात वर्षांत भारताची सौरऊर्जा क्षमता 17 पटीने वाढली आहे. ही क्षमता आता 45,000 मेगावॅटवर पोहोचली आहे. या परिषदेत सर्वांनी BUR आणि हवामानावरील भारताच्या प्रयत्नांचे कौतुक केले. ग्लासगो येथे COP26 हवामान शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींनी अलीकडेच म्हटले होते की, भारत अक्षय्य ऊर्जेच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. पीएम मोदी म्हणाले की 2030 पर्यंत भारतातील निम्म्याहून अधिक ऊर्जा हरित ऊर्जेतून निर्माण होईल.

2030 पर्यंत नूतनीकरणीय स्त्रोतांद्वारे आवश्यक निम्मी ऊर्जा तयार करणे हे त्याचे दुसरे ध्येय आहे. भारत सध्या त्याच्या एकूण विजेच्या गरजेपैकी 70 टक्के कोळशावर अवलंबून आहे आणि 2030 पर्यंत 50 टक्के बिगरजीवाश्म इंधन मिळवणे आव्हानात्मक असेल. 2070 पर्यंत भारत शून्य कर्ब उत्सर्जनाचे लक्ष्य गाठेल, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

संबंधित बातम्या:

सौर ऊर्जा प्रकल्पासाठी सरकारी संस्था, विद्यापीठांचं सहकार्य घ्या, नितीन राऊत यांची महावितरणला सूचना

Solar Energy: घरावर सोलर पॅनल्स लावायचेत, जाणून घ्या किती खर्च येणार?

आता सौर कृषी पंपासाठी ऑनलाईन अर्ज करा, ‘महावितरण’कडून वेबसाईट लॉन्च