मुंबई: आर्थिक सर्वमावेशकतेत वाढ होत असल्याचा डंका आपण वाजवत कितीही वाजवत असलो तरीही भारतातील जवळपास 69 टक्के कुटुंबांकडे कोणतीही आर्थिक सुरक्षा नसल्याचे उघड झाले आहे. हे धक्कादायक वास्तव मनी9 केलेल्या भारतातील सर्वात मोठ्या पर्सनल फायनान्स सर्वेक्षणातून समोर आले आहे. मनी9 आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील रिसर्च ट्रॅंगल संस्था (RTI) यांनी संयुक्तपणे भारतातील नागरिकांच्या पर्सनल फायनान्सचे सर्वेक्षण केले आहे.
या सर्वेक्षणातून भारतीय नागरिकांचे उत्पन्न, खर्च, बचत आणि गुंतवणुकीच्या पद्धतीबद्दल सखोल माहिती घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या सर्वेक्षणातून फायनाशियल सिक्युरिटी इंडेक्सचा वापर करून भारतातील विविध राज्यांची क्रमवारी देखील काढण्यात आली आहे.
2022 मधील मे ते सप्टेंबर महिन्यात केलेल्या या मेगा सर्वेक्षणात 20 राज्यांमधील 100 जिल्ह्यांतील 1150 शहरं आणि गावांमध्ये जाऊन 31,510 कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. हे सर्वेक्षण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(आरबीआय) आणि नॅशनल कॉन्सिल ऑफ अप्लाईड इकोनॉमिक रिसर्च( एनसीएईआर) या संस्था ज्या प्रमाणे सर्वेक्षण करतात तेवढ्याच व्यापक स्तरावर सर्वेक्षण करण्यात आले आहे.
सर्वेक्षणात संपूर्ण भारतातील राज्ये आणि जिल्ह्यांमध्ये भारतीय कुटुंबांमधील आर्थिक सुरक्षिततेचे स्तर मोजण्यासाठी शास्त्रीय पद्धतींचा वापर करण्यात आला आहे.
भारतीय कुटुंबाच्या पर्सनल फायनान्सच्या गरजांबद्दल अतिशय चांगली आकडेवारी या सर्वेक्षणातून मिळाली आहे. या सर्वेक्षणामुळे देशातील 130 नागरिक भारतीय आर्थिक सेवेच्या परिसंस्थेचा फायदा घेऊ शकतील ,असे मत टीव्ही9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरूण दास यांनी व्यक्त केले आहे.
या सर्वेक्षणातून मिळालेल्या मौल्यवान आकडेवारीचा उपयोग भविष्यात धोरणकर्त्यांना धोरण ठरवताना होऊ शकतो,असा विश्वास मनी9 चे संपादक अंशुमन तिवारी यांनी व्यक्त केला आहे.
राष्ट्रीय स्तरावरील या आकडेवारीमुळे सर्वसामान्य कुटुंब आर्थिकदृष्या कशाप्रकारे सुरक्षित होऊ शकतील यावर उपाययोजना करताना हे सर्वेक्षण उपयोगी ठरू शकते,असेही तिवारी यांनी म्हटले आहे.