नवी दिल्ली: कोरोना संकटामुळे अनेकजण बेरोजगार झाले असताना माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रासाठी (IT) अच्छे दिन आल्याचे चित्र आहे. त्यामुळे या क्षेत्रात मोठ्याप्रमाणावर रोजगारनिर्मिती होताना दिसत आहे. नासकॉमच्या माहितीनुसार, यंदाच्या आर्थिक वर्षात भारतातील आघाडीच्या पाच आयटी कंपन्या तब्बल 96 हजार कर्मचाऱ्यांना भरती (Jobs) करुन घेणार आहेत. त्यामुळे आयटी संबंधित शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणांना मोठा दिलासा मिळणार आहे. (Indian IT sector will provide 96000 jobs in this financial year)
काही दिवसांपूर्वीच बँक ऑफ अमेरिकेन एक अहवाल प्रसिद्ध केला होता. यामध्ये आगामी काळात ऑटोमेशनुळे सॉफ्टवेअर क्षेत्रातील जवळपास 30 लाख नोकऱ्या कमी होतील, असे म्हटले होते. मात्र, त्याचवेळी भारतीय आयटी कंपन्यांमधील रोजगारनिर्मितीचे चित्र सुखावणारी बाब आहे.
देशात सध्या माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या 1.6 कोटी रोजगार उपलब्ध करुन देत आहेत. मात्र, 2022 पर्यंत ऑटोमेशनमुळे 30 लाख कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येईल, असा बँक ऑफ अमेरिकेचा अंदाज आहे. या कर्मचारी कपातीमुळे आयटी कंपन्यांची तब्बल 100 अब्ज डॉलर्सची बचत होईल. त्यामुळे आगामी काळात रॉबोट प्रोसेस ऑटोमेशन आयटी क्षेत्रासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.
RPA अर्थात रॉबोट प्रोसेस ऑटोमेशन हे एकप्रकारचे सॉफ्टवेअर आहे. त्यामुळे साचेबद्ध आणि जादा मेहनतीची कामे करण्यासाठी कर्मचाऱ्यांची गरज लागणार नाही. त्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. एकट्या अमेरिकेत RPA मुळे 10 लाख नोकऱ्या जातील, असा अंदाज आहे.
इतर बातम्या:
आनंदाची बातमी! खाद्यतेल स्वस्त होणार, मोदी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
कोरोना काळात भारतीयांनी सर्वात जास्त पैसे स्विस बँकेत टाकले, 13 वर्षांचा विक्रम मोडला
NPS च्या या योजनांमध्ये 6 महिन्यात 20 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा, वाचा तुम्हीही कसा नफा मिळवू शकता
(Indian IT sector will provide 96000 jobs in this financial year)