आर्थिक वर्ष संपत आले आहे. कर्मचाऱ्यांना इन्क्रीमेंटचे वेध लागले आहेत. अनेक कंपन्यांनी इन्क्रीमेंटची प्रक्रिया सुरु केली आहे. परंतु एक कर्मचाऱ्याचे इन्क्रीमेंट सांगितल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसणार आहे. भारतीय सीईओला त्याच्या कंपनीने लाखांमध्ये नाही तर कोटीमध्ये पगारवाढ दिली आहे. ही पगार वाढ एक, दोन कोटी नाही तर तब्बल 30 कोटी रुपये आहे. आता त्यांची रोजची कमाई 45 लाख रुपये झाली आहे. हे भारतीय सीईओ म्हणजे आयबीएम कंपनीमधील सीईओ अरविंद कृष्णा आहेत. आता त्यांचे पॅकेज 154 कोटी झाले आहे.
आयबीएम कंपनीत भारतीय असलेले अरविंद कृष्णा सीईओ आहे. त्यांना कंपनीने 30 कोटी रुपये पगार वाढ दिली आहे. यापूर्वीच कृष्णा यांना कंपनीने भरभक्कम पॅकेज दिले आहे. कंपनी त्यांना आता एक दिवसासाठी तब्बल 45 लाख रुपये देत आहे. अरविंद कृष्णा हे आयबीएममध्ये नुकतेच रुजू झालेले नाही. गेल्या 34 वर्षांपासून त्यांची आयबीएम कंपनीसोबत वाटचाल सुरु आहे. आता ते कंपनीत नेतृत्व करत आहे. 2020 मध्ये त्यांना सीईओ करण्यात आले होते. मागील वर्षी त्यांचे वार्षिक पॅकज 135 कोटी रुपये होते. आता त्यात 30 कोटी वाढले आहे.
IBM ही जगातील सर्वात जुनी आणि दिग्गज कंपनी आहे. या कंपनीत कधीकाळी भारतीय उद्योजक रतन टाटा यांनीही नोकरी केली होती. सध्या आयबीएमचे मार्केट कॅप 14.57 लाख कोटी रुपये आहे. अरविंद यांनी 1990 मध्ये कंपनी ज्वाइन केली होती. कंपनीचे सीईओ होण्यापूर्वी त्यांनी कंपनीतील विविध पदांवर काम केले आहे.
अरविंद कृष्णा यांनी आयबीएम कंपनीसाठी कॉरपोरेट डील करण्यात महत्वाची भूमिका बजावली. त्यांच्या नेतृत्वाखाली रेड हॅट कंपनीचे अधिग्रहण झाले. 34 अब्ज डॉलरचा हा व्यवसाय होता. अरविंद कृष्णा यांचा जन्म आंध्र प्रदेशात झाला. त्याचे वडील भारतीय सैन्य दलात अधिकारी होते. त्यांचे शालेय शिक्षण तामिळनाडूत झाले. कानपूर आयआयटीमधून त्यांनी अभियंत्रिकीची पदवी घेतली. इलेक्ट्रिकल इंजीनियरिंगमध्ये पीएचडी करण्यासाठी ते अमेरिकेत गेले. त्यानंतर त्यांचे जीवन बदलले.