महागाईचा फटका हा सर्वच स्तरातील लोकांना बसत असतो. भविष्यात तो कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. अशा वेळी भविष्याची चिंता दूर करण्यासाठी आपण नोकरीबरोबरच गुंतवणूकही करतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की तुम्ही ज्या योजनेत गुंतवणूक करत आहात ती रक्कम जेव्हा तुम्हाला मिळेल त्यानंतर त्याचे मूल्य किती असेल? आपण आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करत असतो. पण अनेक गुंतवणूक योजना 10-15 वर्षांनी मॅच्युअर्ड होतात. जेव्हा 10-15 वर्षांनी परताव्याची रक्कम कळते तेव्हा कळते की त्याचे मूल्य आजच्या तुलनेत कमीच आहे.
दरवर्षी महागाई दर वाढत चालला आहे. त्यामुळे काळाबरोबर रुपयाचे मूल्य कमी होत जाते. आज तेल 150 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे. 5 वर्षांपूर्वी त्याची किंमत 70 रुपये होती. पुढील 10 वर्षांनी तेलाचे दर प्रतिलिटर 300 रुपये होऊ शकतात. अशाप्रकारे सोने, चांदी, घरे यासारख्या इतर वस्तूंचे देखील असेत असते. महागाई कितीही असली तरी ग्राहक या सर्व वस्तू खरेदी करणारच असतात. त्यामुळे रुपयाचे मूल्य कमी होत जाते.
उदाहरणार्थ, जिथे 10 वर्षांपूर्वी तुम्ही 100 रुपयांना 3-4 वस्तू खरेदी करू शकत होतो. आता मात्र 100 रुपयांना फक्त एकच वस्तू खरेदी करता येते. महागाई वाढली तर कदाचित 10 वर्षानंतर 100 रुपयांना एकही वस्तू मिळणार नाही. अशा प्रकारे 100 रुपयांचे मूल्य कमी होत जाईल.
जर आपण महागाई दर 6 टक्के गृहीत धरला तर 10 वर्षानंतर 1 कोटी रुपयांचे मूल्य अंदाजे 55.84 लाख रुपये होईल. त्याचप्रमाणे, 20 वर्षांनंतर 1 कोटी रुपयाची किंमत अंदाजे 31 लाख रुपये होईल. याचा अर्थ कोट्यवधी रुपयांचे मूल्य दर दशकात घसरत राहील.
तुमच्या बचत खात्यात आज समजा 1 कोटी रुपये जमा आहेत, ज्याला तुम्ही आज खूप मोठी गोष्ट मानत आहात. परंतु जेव्हा हिशोबानुसार 10 वर्षांनंतर या 1 कोटी रुपयांची किंमत सुमारे 55 लाख रुपये होईल. आता रुपयाचे मूल्य कमी होत असल्याने भविष्यातील गरजा भागवण्यासाठी ते पुरेसे ठरणार नाही.
उदाहरणार्थ, आज तुम्ही 15 वर्षांपूर्वी जेवढ्या पैशात किराणा सामान खरेदी करायचो त्याच रकमेत खरेदी करू शकता? उत्तर आहे, नाही. आजच्या आणि 15 वर्षांपूर्वीच्या खर्चातील फरक स्पष्टपणे दर्शवतो की महागाईमुळे पैशाचे मूल्य कमी होते. आता पैशाचे मूल्य कमी होत असताना त्याचा परिणाम बचतीवरही होत आहे.